• 31 Mar, 2023 08:01

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Scholarship Scheme: पीएम स्कॉलरशीप योजनेअंतर्गत अर्ज भरणे प्रक्रिया सुरू, जाणून घ्या शेवटची तारीख

PM Scholarship Scheme

Image Source : http://www.dnaindia.com/

केंद्र शासन व राज्य शासनाच्यावतीने 2022-2023 पीएम स्कॉलरशीप या योजनेसाठी अर्ज भरणे प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. चला, तर मग जाणून घेवुयात पीएम स्कॉलरशीप योजनेबाबत संपूर्ण माहिती.

पीएम स्कॉलरशीप या योजने अंतर्गत विदयार्थ्यांना पदवी शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. जेणेकरून हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना किती पैसे मिळतात? कोणते विद्यार्थ्यी पात्र आहेत? अर्जाची अंतिम तारीख काय आहे? या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. 

ही योजना सुरू करण्यामागील हेतू?

पीएम स्कॉलरशीप योजना ही दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी या हेतूने सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांची बारावी पास असणारी मुले अर्ज करू शकतात. मात्र या मुलांना बारावीमध्ये 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. जर यापेक्षा कमी टक्के असले की, या मुलांना पीएम स्कॉलरशीप योजनेचा लाभ घेता येणार नाही.

 लाभार्थी कोण असणार?

पीएम स्कॉलरशीप योजनेसाठी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कर्मचारी, असम रायफल्स, आरपीएफ व आरपीएसएफ सैनिकांची मुले अर्ज करू शकतात. सोबतच नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांची मुलेदेखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त दिव्यांग सैनिकांची मुलेदेखील या योजनेचा लाभ घेवु शकतात.

किती मिळणार मदत?

 पीएम स्कॉलरशीप ही विदयार्थ्यांना पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिली जाते. या स्कॉलरशीप अंतर्गत मुलांना 2500 रूपये तर मुलींना 3000 रूपये दिले जाते. या योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी ऑफीशियल वेबसाइटला भेट द्या.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

पीएम स्कॉलरशीप योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 एप्रिल आहे. या योजनेअंतर्गत विदयार्थ्यांना वर्षाला 36000 रूपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. तसेच अर्ज भरण्यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा व योजनेसंबंधी संपूर्ण माहिती जाणून घ्या.

अर्ज करण्याची प्रक्रिया

Https://Www.Scholarships.Gov.In/ वेबसाइटला भेट द्या 
Apply  या बटणावर क्लिक करा
अटी, नियम व पात्रता या अचूक वाचा
विद्यार्थ्यी रजिस्ट्रेशनसाठी New User या बटणावर क्लिक करा 
वैयक्तिक माहिती व शिक्षणासंबंधी आपली अचूक माहिती अर्जामध्ये भरावी
ओळखपत्र, पत्ता व शिक्षणाचा पुरावा देणारे महत्वाची कागदपत्रे अपलोड करा 
यानंतर आपल्याला एक रजिस्ट्रेशन झाल्याचा मॅसेज येईल व एक नंबर मिळेल. हा रजिस्ट्रेशन नंबर लक्षात ठेवा कारण अर्जाविषयी अपडेट मिळविण्यासाठी हा नंबर लागेल. 
तसेच आपण जर या योजनेसाठी पात्र ठरला, तर तुमच्या खात्यात या योजनेची ठराविक रक्कम जमा होईल.