Monthly Income Scheme: पोस्ट ऑफिस बचत योजना नेहमीच चांगल्या परताव्याची हमी देत आल्या आहेत त्यामुळे या योजना सर्व सामान्यांच्या पसंतीस नेहमीच उतरलेल्या आपणास दिसतात त्यातलीच एक योजना म्हणजे नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम स्कीम यात आपली निव्वळ रक्कम सुरक्षित तर राहतेच प्लस आपल्याला दर महिन्याला त्या रक्कमेवर 6.6% व्याजही प्राप्त होते. त्यामुळे पोस्ट ऑफिस एमआयएसमध्ये गुंतवणूक चांगल्या रिटर्नसह निश्चित उत्पन्न उपलब्ध करते.
Table of contents [Show]
मासिक योजना काय आहे?
तुम्हाला पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत एकरकमी रक्कम जमा करावी लागेल. रक्कम जमा केल्यानंतर, तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम व्याज म्हणून मिळत राहील. या योजनेअंतर्गत अर्जदाराने किमान 1000 रुपये जमा करणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये जमा करता येतात. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत, 2 किंवा 3 जण मिळून 9 लाखांपर्यंत संयुक्त खाते (Joint Account) उघडू शकतात.
योजनेत मिळणारे व्याज किती?
पोस्ट ऑफिसच्या या योजनेंतर्गत वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळते. समजा तुम्ही या योजनेत संयुक्त खाते उघडून 9 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी 59,400 रुपये व्याज मिळेल. यानुसार, तुम्ही दरमहा 4,950 रुपये कमवू शकाल. दुसरीकडे, एका खात्यात 4.5 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला दरमहा 2,475 रुपये व्याज मिळते. जर गुंतवणूक दाराने खात्यातून दरमहा पैसे न काढल्यास ते पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा राहतील आणि मूळ रक्कमे सोबत त्यावर व्याज मिळेल.
मॅच्युरिटी कालावधी
- या योजनेअंतर्गत मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे राहील.
- तुम्ही 5 वर्षानंतरच ठेव काढू शकता.
- जर हवे असल्यास ती रक्कम पुन्हा गुंतवू शकतात.
आधी रक्कम काढायची असल्यास?
- वर्षभरा नंतरच ही रक्कम तुम्हास विथड्रॉ करता येईल.
- जर खात्यातून 1 ते 3 वर्षाच्या आत पैसे काढायचे असतील तर 2% कपात रकमेतून केली जाईल.
- 3 वर्षानंतर पैसे काढायचे असतील तर 1% रक्कम कापून उर्वरित रक्कम गुंतवणूक दारास देण्यात येईल.
योजनेसाठी वयोमर्यादा
- 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीसाठी एमआयएस खाते उघडता येते.
- भारतीय नागरिक या योजनेचा सभासद होऊ शकतो
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराकडे आधार कार्ड आणि पॅनकार्ड आवश्यक
- पासपोर्ट आकाराचे फोटो