Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Central Bank of India: जाणून घ्या, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या Cent mobile app बद्दल!

Central Bank of India, Cent mobile app

Image Source : http://www.centralbankofindia.co.in/

Central Bank of India: सेंट्रल बँक ऑफ इंडिया आपल्या सर्व ग्राहकांना इंटरनेट बँकिंग (Internet banking) तसेच मोबाईल बँकिंग (Mobile banking) सुविधा प्रदान करते. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मोबाईल बँकिंगसाठी सेंट मोबाइल (Cent Mobile )नावाचे ॲप सुरू केले आहे.

Central Bank of India: सेंट्रल बँक ऑफ इंडिया आपल्या सर्व ग्राहकांना इंटरनेट बँकिंग (Internet banking) तसेच मोबाईल बँकिंग (Mobile banking) सुविधा प्रदान करते.  सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मोबाईल बँकिंगसाठी सेंट मोबाइल (Cent Mobile )नावाचे ॲप सुरू केले आहे. जवळपास सर्व बँकांनी आता मोबाईल बँकिंग ऑनलाइन देण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मोबाईल बँकिंग वापरले नसेल, तर या माहितीची तुम्हाला मदत होऊ शकते, जाणून घ्या त्याबद्दल अधिक माहिती. 

CBI बँक मोबाईल बँकिंगचे फायदे? (Benefits of CBI Bank Mobile Banking?)

  • सेंट्रल बँक ऑफ इंडियाची मोबाईल बँकिंग सुविधा मिळवण्यासाठी आता तुम्हाला अनेक घराबाहेर जावे लागणार नाही कारण युजर्स हेच काम आपल्या मोबाईल फोनमध्ये घरी बसून करू शकतो.
  • सीबीआय मोबाइल बँकिंग (CBI Mobile Banking) ऑनलाइन सक्रिय (Active)झाल्यानंतर, तुम्ही तुमचे बँक खाते हाताळू शकता, परंतु बँकेत अशी अनेक कामे केली जातात, ज्यासाठी तुम्हाला होम ब्रँचमध्ये जावे लागते.
  • सीबीआयच्या मोबाइल बँकिंगच्या सुविधेचा वापर करण्यासाठी, प्रत्येक वापरकर्त्याला 2 स्टेप पार कराव्या लागतील, ज्यामध्ये प्रथम नोंदणी आणि नंतर सेंट्रल बँक मोबाइल बँकिंग सक्रिय करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही सुविधा कशी सुरू करता येईल. 
  • बँक बॅलेन्स चेक (Bank Balance Check) करू शकता.  तुम्ही मागील काही व्यवहारांचे मिनी स्टेटमेंट (Mini Statement) पाहू शकता. एसएमएस अलर्ट मिळू शकतात.
  • तुम्ही तुमच्या खात्याचे संपूर्ण बँक खाते डिटेल्स चेक करू शकता. निधी हस्तांतरण (Transfer of Funds) कोणत्याही बँकेत केले जाऊ शकते.
  • एनईएफटी आणि आरटीजीएसचा (NEFT and RTGS) वापर दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जाऊ शकतो. बिल पेमेंट करता येते.
  • तुम्ही वैयक्तिक बँकिंग वापरासाठी एटीएम कार्डची विनंती करू शकता. बँक खात्यामध्ये काही सायबर क्राइम झाल्यास एटीएम कार्ड देखील ब्लॉक करण्याची सुविधा.
  • आणखी चांगल्या सुविधेत तुम्ही आधार क्रमांक देखील लिंक करू शकता. मोबाइल बँकिंगमधून चेकबुकसाठी ऑनलाइन चेकबुक रिक्वेस्ट देखील केली जाऊ शकते.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मोबाईल बँकिंग कसे सुरू करावे? (How to Apply Central Bank of India Mobile Banking?)

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मोबाईल बँक वापरण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मोबाइल बँकिंग ॲप  म्हणजेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे सेंट अँड्रॉइड मोबाइल बँकिंग ॲप इंस्टॉल करावे लागेल. CBI बँक ॲप  इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्ही मोबाईल बँकिंग नोंदणी दोन प्रकारे करू शकता.

  • बँकेला भेट न देता इंटरनेट बँकिंग वापरकर्ता आयडी आणि पासवर्डच्या मदतीने.
  • सेंट्रल बँक ऑफ इंडियाला भेट देऊन.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मोबाईल बँकिंग कसे सक्रिय करावे?(How to Activate Central Bank of India Mobile Banking?)

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोननुसार सपोर्टेड मोबाईल बँकिंग ॲप डाउनलोड करा.
  • अटी आणि नियम स्वीकारा.
  • New User Registration वर क्लिक करा.
  • तुमच्या बँक पासबुकवर छापलेला CIF नंबर समाविष्ट करा.
  • सबमिट वर क्लिक करा. (जर तुमच्या पासबुकमध्ये CIF छापलेले नसेल तर बँकेला भेट द्या.)
  • बँकेत नोंदणीकृत मोबाईल क्रमांक 6 अंकावर प्राप्त झालेला OTP समाविष्ट  करा.
  • सबमिट वर क्लिक करा.