Increase in purchase of paddy: चालू खरीप विपणन हंगाम 2022-23 मध्ये आतापर्यंत केंद्रीय पूलसाठी सरकारची धान खरेदी 9% ने वाढून 306.06 लाख टन झाली आहे. अन्न मंत्रालयाच्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. पंजाब, हरियाणा, छत्तीसगड आणि तेलंगणा (Punjab, Haryana, Chhattisgarh and Telangana) येथून मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी करण्यात आली आहे. ऑक्टोबरपासून नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर भात खरेदी सुरू होते. मात्र, दक्षिणेकडील राज्यांमध्ये विशेषतः केरळ आणि तामिळनाडूमध्ये हे काम सप्टेंबरपासून सुरू होते.
सरकारी आकडेवारीनुसार (Government Statistics)
खरीप विपणन हंगाम 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) मध्ये 775.72 लाख टन धान खरेदी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. गेल्या खरीप पणन हंगामात प्रत्यक्ष खरेदी विक्रमी 759.32 लाख टन होती. सरकारी आकडेवारीनुसार, खरीप मार्केटिंग हंगाम 2022-23 मध्ये 27 नोव्हेंबरपर्यंत एकूण धान खरेदी 306.06 लाख टन झाली आहे, जी एका वर्षापूर्वी याच कालावधीत 280.51 लाख टन होती.
पंजाबमध्ये धान खरेदीत 2.76 टक्क्याने घट (Paddy Procurement in Punjab Decline)
पंजाबमधील भातखरेदी या विपणन वर्षात आतापर्यंत 2.76% ने घटून 181.62 लाख टन झाली आहे, जी मागील वर्षीच्या कालावधीत 186.79 लाख टन होती. हरियाणातील धान खरेदी गेल्या वर्षीच्या 54.50 लाख टनांच्या तुलनेत 8.18% ने वाढून 58.96 लाख टन झाली आहे. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, या वर्षी छत्तीसगडमध्ये आतापर्यंत 16.88 लाख टन धानाची खरेदी करण्यात आली आहे, तर गेल्या वर्षी या कालावधीत धानाची खरेदीही सुरू झाली नव्हती.
तेलंगणा-यूपीमध्ये धान खरेदीत वाढ (Paddy Procurement in Telangana-UP Increased)
तेलंगणात या वर्षी आतापर्यंत 16.18 लाख टन धानाची खरेदी झाली आहे, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 10.94 लाख टन होती. त्याचप्रमाणे, उत्तर प्रदेशातील धानाची खरेदी या कालावधीत 9.20 लाख टनांवरून 10.28 लाख टन झाली आहे. सरकारी मालकीच्या भारतीय अन्न महामंडळ (Food Corporation of India)(FCI) आणि खाजगी एजन्सी या दोन्हीकडून धानाची खरेदी केली जाते. किमान आधारभूत किमतीवर थेट शेतकऱ्यांकडून धान खरेदी केले जाते आणि विविध कल्याणकारी योजनांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.