Farm Land: शेतजमीन विकत घेताना अनेकदा फसवणुकीचे (Fraud) प्रकार समोर आलेले आपण ऐकतो. एकच जमीन दोघांना विकणे, जमिनीची मालकी दुसऱ्याची आणि विक्री कोणी दुसराच करतो, या फसवणुकीतून वाचण्यासाठी शेत जमिनीसाठी सर्वात महत्वाचे म्हणजे सातबारा. जमिनीची खरेदी करण्याआधी सातबारा उतारा चेक करून घेणे फार महत्वाचे ठरते. त्यासोबतच कोणकोणत्या बाबी लक्षात घेणे महत्वाचे आहे ते जाणून घेऊया.
Table of contents [Show]
जमिनीचा 7/12 चेक करून घेणे (Getting the land checked 7/12)
जिथे आपल्याला जमीन खरेदी करायची आहे, त्या गावातील तलाठ्याकडून जमिनीचा नवीन सातबारा काढून घ्यावा. त्यावरील फेरफार आणि आठ-अ उतारे तपासून घ्यावे. सातबाऱ्यावरील नावे ही विक्री करणाऱ्या व्यक्तीचींच आहे का? ते तपासून घ्यावे. त्यावर मृत व्यक्ती किंवा इतर कोणाची नावे असल्यास ती काढून टाकण्यास सांगावे. जमिनीवर कोणत्याही बॅंकेचे कर्ज नाही, याची खात्री करावी. काही वर्षा पूर्वीचे जमिनीचे कागदपत्रे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. फेरफार उतारे चेक करून तुम्हाला जमिनीच्या मालकी विषयी माहिती मिळते.
जमिनीचा नकाशा चेक करून करून घेणे (Getting the land map checked)
आपण खरेदी करीत असलेली जमीन कुठून कुठे पर्यंत आहे, हे चेक करण्यासाठी जमिनीचा नकाशा महत्वाचा ठरतो. ज्या गटातील शेतजमीन खरेदी करायची आहे, त्या गटाचा नकाशा पाहणं गरजेचं असतं. नकाशात दाखविल्याप्रमाणे जमीन आहे की नाही हे चेक करून घ्या. आपण जी जमीन खरेदी करत आहे, त्याच्या चारही बाजूंना कोणते गट नंबर आहेत, याची माहिती मिळते.
शेत रस्ता (farm road)
जी जमीन खरेदी करायची आहे, तिथं जाण्यासाठी शेतरस्ता आहे की नाही हे तपासून घेणे सुद्धा महत्वाचे आहे. काही वेळा जमीन मधात असल्याने त्याला जाण्यासाठी रस्ता नसतो, दुसऱ्याच्या शेतातून केल्याने त्यांना अडचण असेल तर वाद होतो म्हणून आधीच या सर्व गोष्टींची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
भूधारणा पद्धत तपासून घेणे (To check the land holding system)
सातबारा उतारा करीत असतांना त्यावर जी जमीन खरेदी करायची आहे, ती कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत येते, हे बघून घ्यावे. सातबारा उताऱ्यावर भूधारणा पद्धतीची नोंद केलेली असते. जर सातबाऱ्यावर भोगवटादार वर्ग- 1 पद्धत असेल, तर ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो. म्हणजे ही जमीन विक्री करणाऱ्याच्या स्वत:च्या मालकीची असून ती खरेदी करताना विशेष अडचण येत नाही.
भोगवटादार वर्ग 2 (Occupancy Class 2)
सातबाऱ्यावर भोगवटादार वर्ग 2 असं नमूद केलं असेल, तर या जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत. सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही. यामध्ये देवस्थान इनाम जमिनी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी इ. जमिनींचा समावेश होतो.