Before renting a house: अनेकजण घर खरेदी करण्यापेक्षा भाड्याने(Rent) घेऊन राहण्याला प्राधान्य देतात. यामुळे टॅक्समध्ये(Tax) बचतही होते आणि तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक ही करता येते. तुम्हाला आवडणाऱ्या शहरात भाड्याने घर शोधणे आणि तेही परवडणाऱ्या किमतीत, हे एक आव्हानचं असते. पण तुम्हाला माहित आहे का? भाडयाने घर घेताना तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला अशाच गोष्टींबद्दल सांगणार आहोत. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
भाड्याने घर शोधताना 5 मुद्दे नक्की विचारात घ्या
तुम्ही भाड्याने घर शोधत असाल, तर तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्या आहेत. त्यातीलच काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे-
बजेटचा विचार(Budget considerations)
भाड्याने घर शोधण्याचा प्रयत्न करताना सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे त्यासाठी तुम्ही निश्चित केलेले बजेट(Budget). तुमची आर्थिक आणि मालमत्तेशी संबंधित सर्व प्राधान्ये लक्षात घेऊन तुम्ही बजेट तयार करायला हवे. उपयुक्तता आणि इतर अतिरिक्त खर्च भाड्यात समाविष्ट नसतात त्यामुळे, तुम्हाला भाड्याच्या अंदाजे रकमेची आणि इतर मूलभूत उपयुक्तता सेवांची आवश्यकता असेल व ते तुम्हाला परवडेल का? हे तपासणे गरजेचे आहे.
तुम्ही घर भाड्याने घेण्यापूर्वी कनेक्टिव्हिटीचे(Connectivity) फायदे तपासणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या ठिकाणी भाड्याने(Rent) घर निवडत आहात ते ठिकाण चांगले विकसित आणि शहराच्या इतर भागांशी जोडलेले असावे जेणेकरून वाजवी अंतरावर मेट्रो स्टेशन(Metro Station) किंवा बस स्टॉप(Bus Stop) असल्याने तुमच्या दैनंदिन जीवनात सुसूत्रता आणताना तुमचा वेळ आणि पैसा वाचण्यास मदत होईल.
सुरक्षितता आणि सुरक्षा(Safety and security)
एकटे राहण्यासाठी किंवा कुटुंबासह राहण्यासाठी मालमत्ता भाड्याने घेताना सुरक्षा(Safety) हा एक महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही सोसायटीमध्ये पुरवल्या जाणार्या सुरक्षा सेवा तपासून घ्या. सुरक्षेसाठी CCTV किंवा सुरक्षा रक्षक(Watchmen) आहे की नाही हे देखील तपासून घ्या.यासोबतच भाड्याचे स्वतंत्र घर निवडल्यास, ठिकाण आणि गल्ल्या किती सुसज्ज आणि सुरक्षित आहेत हे तपासण्यास विसरू नका.
भाडे करार(Rental agreement)
भाडे करारावर(Rent Agreement) स्वाक्षरी करण्यापूर्वी, तुम्ही त्यात नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती पूर्ण केल्याचे सुनिश्चित करून घ्या. अशा काही अटी असू शकतात ज्या तुम्हाला मान्य नसतील किंवा तुम्हाला समजण्यात अडचण येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये समजून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या घरमालकाशी संपर्क साधावा. तसेच, तुम्ही निवडलेल्या घरामध्ये भाड्याने जाण्यापूर्वी तुम्हाला किती रक्कम द्यावी लागणार आहे याबद्दल तुमच्या मालमत्तेच्या मालकाला विचारून घ्या.
टायटल चेक(Title check)
घर भाड्याने घेताना ते घर नक्कीच मालकाच्याच नवे आहे ना, याची नोंद घ्या. टायटल चेक ही भाड्याने निवडलेल्या घराच्या व्यवहाराच्या हिस्ट्रीची(History Checking) तपासणी करण्याची प्रक्रिया आहे. टायटल चेक मिळविण्यासाठी, तुम्ही कोणत्याही कायदेशीर सल्लागाराची मदत घेऊ शकता ज्यामुळे तुमची फसवणूक टाळू शकते.