राज्याला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकार करण अदानी आणि अनंत अंबानी यांसारख्या उद्योगपतींचा सल्ला घेणार आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आर्थिक सल्लागार परिषद (ईएसी) स्थापन केल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने नुकतीच दिली आहे.करण अदानी हे ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी यांचा मुलगा आणि अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेडचे सीईओ आहेत. महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या 21 सदस्यीय ईएसीमध्ये करण अदानी आणि रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचीही नावे आहेत. अनंत हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक आहेत.
सरकारने जारी केलेल्या ठरावात असे सांगण्यात आले आहे की, EAC स्वतंत्र युनिट म्हणून सरकारला आर्थिक आणि इतर प्रकारचे सल्ले देईल. EAC मध्ये कापड, फार्मा, बंदरे, विशेष आर्थिक क्षेत्र, बँकिंग, कृषी, उद्योग, अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे.21 सदस्यीय EAC मध्ये एक अध्यक्ष, तीन पूर्णवेळ सदस्य (जे राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी असतील) आणि 17 स्थायी सदस्य असतील. विविध क्षेत्रांमध्ये समन्वय साधून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचे महाराष्ट्राचे उद्दिष्ट असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
EAC मध्ये आणखी कोण कोण असणार?
ईएसीमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरचे एमडी संजीव मेहता, एलअँडटीचे सीईओ एसएन सुब्रमण्यम, दलित चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू अजित रानडे यांचाही समावेश आहे. सरकारचे प्रतिनिधित्व वरिष्ठ नोकरशहा ओपी गुप्ता, हर्षदीप कांबळे आणि राजगोपाल देवरा हे EAC मध्ये स्थायी सदस्य म्हणून काम करतील.
खरंतर महिनाभरापूर्वीच ही निवड झाली होती. पण आता हिंडेनबर्ग रिसर्चनंतर गौतम अदानी वादात सापडले आहेत. यामुळे वेगवेगळ्या प्रकारे आता यावरदेखील नागरिक व्यक्त होत आहेत.