Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kalyan Jewellers ची दिवाळीनिमित्त भन्नाट ऑफर! सोन्याची खरेदी आणि गुंतवणूकही करा!

Kalyan Jewelers Diwali Offers 2022

Kalyan Jewellers Diwali Offer : दिवाळीनिमित्त सर्वत्र शॉपिंगवर भर दिला जात आहे. त्यात सोन्याच्या खरेदीला तर दिवाळीत उधाण येतं. याच पार्श्वभूमीवर कल्याण ज्वेलर्सने दागिन्यांच्या खरेदीवर आणि सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणल्या आहेत.

Kalyan Jewellers: ग्राहकांची विश्वासार्हता जपणाऱ्या ज्वेलर्सपैकी एक म्हणजे कल्याण ज्वेलर्स. कल्याण ज्वेलर्सने सोनं, मौल्यवान खडे आणि हिऱ्यांच्या दागिन्यांवर दिवाळी ऑफर जाहीर केल्या आहेत. या सर्व ऑफर प्रत्येक भागात वेगवेगळ्या आहे. सणासुदीच्या काळात भारतीय पारंपारिक दागिन्यांचा ट्रेंड कायम ठेवत, कल्याण ज्वेलर्सने ग्राहकांना त्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर ‘वन ऑफ इट्स काईंड’ ऑफर जाहीर केल्या आहेत. ‘धीस दिवाळी विथ कल्याण’ ही थीम कल्याण ज्वेलर्सकडून राबविण्यात येत आहे. (Amazing Diwali Offers from Kalyan Jewellers)

‘धीस दिवाळी विथ कल्याण’(This Diwali With Kalyan)

कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरामन यांनी दिवाळीनिमित्त आणलेल्या ऑफर्सबद्दल सांगताना म्हणाले की, यावर्षी आम्ही अनोख्या ऑफर्ससह दिवाळी सेलिब्रेशन करणार आहोत. दिवाळी सणाशी आणि विशेषत: दागिन्यांबाबत ग्राहकांच्या विशेष भावना आहेत. म्हणूनच आम्ही ग्राहकांसाठी दागिन्यांच्या खरेदीवर त्यांना उत्तम ऑफर देऊन जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करत आहोत. ‘धीस दिवाळी विथ कल्याण’ (This Diwali With Kalyan) ऑफरचा लाभ ग्राहकांना 20 नोव्हेंबर, 2022 पर्यंत कल्याण ज्वेलर्सच्या देशभरातील सर्व शोरूममध्ये घेता येणार आहे. 

Kalyan Jewellers Sale

कल्याण ज्वेलर्सने दिवाळीनिमित्त कल्याण ज्वेलर्स गोल्ड स्कीम (Kalyan Jewelers Gold scheme) आणि कल्याण ज्वेलर्स गोल्ड धनवर्ष योजना (Kalyan Jewelers Gold Dhanvarsh Scheme) या योजना आणल्या आहेत. कल्याण ज्वेलर्सने खूप कमी कालावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. 1993 पासून कल्याण ज्वेलर्सने देशभरात आणि जगभरात 135 शोरूम ओपन केले आहेत.

कल्याण ज्वेलर्स गोल्ड स्कीम (Kalyan Jewelers Gold scheme)

कल्याण ज्वेलर्सची धनवर्ष सुवर्ण योजना ही ग्राहकांना अतिशय सोईची आहे. कोणतीही नोंदणी फी नाही. तुम्ही कल्याण ज्वेलर्सच्या कोणत्याही स्टोअरला भेट देऊन किंवा ऑनलाईन अर्ज भरून या योजनेसाठी नावनोंदणी करू शकता. या योजनेची मुदत 12 महिने आहे.

कल्याण ज्वेलर्स गोल्ड स्कीम पॉलिसीअंतर्गत ग्राहक प्रत्येक महिन्याच्या आठ तारखेला त्यांचा निर्णय बदलू शकतो. गोल्ड बुकिंग पॉलिसी अंतर्गत मासिक हप्त्यांचे मूल्य पॉलिसीच्या सुरुवातीला निवडलेल्या प्रॉडक्टवर अवलंबून असते.

कल्याण ज्वेलर्स गोल्ड स्कीमचा लाभ घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

ज्यांना कल्याण ज्वेलर्स गोल्ड स्कीमचा ऑनलाईन लाभ घ्यायचा आहे; त्यांना यासाठी अतिरिक्त शिपिंग फी भरावी लागणार आहे. 
कल्याण ज्वेलर्स गोल्ड स्कीमद्वारे खरेदी केलेल्या दागिन्यांनवर GST भरावा लागणार आहे.
गोल्ड कार्ड धारकांना योजनेत नावनोंदणी करण्यासाठी कोणतेही पॉईंट्स दिले जात नाहीत.


कल्याण ज्वेलर्स गोल्ड स्कीम पात्रता आणि अटी 

  • कल्याण ज्वेलर्स गोल्ड गुंतवणूक योजना सर्व भारतीयांसाठी खुली आहे. अल्पवयीन मुले म्हणजेच 18 वर्षांखालील मुले यात गुंतवणूक करू शकत नाही. 
  • या स्कीम अंतर्गत वेळापत्रकानुसार पेमेंट करणे महत्त्वाचे आहे. ठरलेल्या वेळेत पेमेंट न केल्यास मूळ किमतीच्या खर्चात 0.25 टक्के वाढ होऊ शकते.
  • ही योजना संपल्यापासून 20 दिवसांच्या आत ग्राहक दागिने घेऊन न गेल्यास त्यांचे दागिने राखीव ठेवले जातात. 
  • ग्राहकांनी शेवटच्या हप्त्याचे पेमेंट चुकवल्यास, पॉलिसी रद्द केली जाईल आणि ग्राहकाने दिलेल्या पत्त्यावर त्याचे पैसे परत पाठवले जातील.


स्कीमसाठी आवश्यक कागदपत्रे

योजनेसाठी नावनोंदणी करण्‍यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता लागते. 
1. पॅन कार्ड
2. पासपोर्ट
3. वाहन चालविण्याचा परवाना

सदर योजना बंद करताना ज्या व्यक्तीने ही योजना सुरू केली आहे. त्याच व्यक्तीने आपली ओळख पटवून योजना बंद करण्याची पूर्तता करावी लागते. 

कल्याण ज्वेलर्स गोल्ड धनवर्ष योजना (Kalyan Jewelers Gold Dhanvarsh Scheme)

कल्याण ज्वेलर्स विविध सेवा पुरवते. धनवर्ष ही एक सुवर्ण योजना आहे जी लोकांना सोन्यात पैसे वाचवण्याची उत्तम संधी देते. ज्या ग्राहकांना सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम, पोल्की, मौल्यवान स्टोन आणि दागिने खरेदी करण्यात आवड आहे. ते विविध बचत योजनांमध्ये सामील होऊ शकतात आणि 11 महिन्यांच्या कालावधीत मासिक पेमेंट करू शकतात.

Image Source :  www.candere.com