Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

'Jio New Year Offer 2023 ' ची घोषणा, मिळणार 5G डेटा आणि बरंच काही...

Jio New Year 2023 offer

Jio New Year Offer 2023: नवीन वर्षाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने 2023 रुपयांचा विशेष प्लॅन आणला आहे.

Jio New Year Offer 2023:  टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओने(Reliance Jio) नवीन वर्षानिमित्त ग्राहकांसाठी एक खास ऑफर(Offer) सादर केली आहे. या Jio Offer अंतगर्त कंपनीने '2023' रुपयांचा स्पेशल रिचार्ज प्लॅन सादर केला आहे, ज्यात एकूण 630GB डेटा सोबत फ्री कॉलिंग(Free Calling) आणि काही जियो अ‍ॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन(Jio App Free Subscription) मिळणार आहे.  चला तर जाणून घेऊयात या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज किती डेटा आणि कोणते लाभ मिळणार आहेत.

'Jio New Year Offer' मध्ये काय मिळेल? 

  • Jio च्या 2023 रुपयांच्या नव्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 2.5 जीबी डेटा मिळणार आहे 
  • या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा(unlimited voice calling) फायदा मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना ऑन(On) आणि ऑफ(Off) नेटवर्कचा अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळणार आहे
  • तसेच लोकल(Local) आणि एसटीडी(STD) नंबर्सवर एसएमएस(SMS) पाठवण्यासाठी डेली 100 एसएमएस मोफत मिळणार आहेत 
  • Jio च्या या 2023 रुपयांच्या नव्या प्लॅनची वैधता 252 दिवस असणार आहे. म्हणजे हा एक लॉन्ग टर्म रिचार्ज प्लॅन(long term recharge plan) असणार आहे
  • रिलायन्स जियो युजर्सना कंपनीकडून मिळणारा अतिरिक्त फायदा म्हणजे Jio Apps चे फ्री सब्सक्रिप्शन. यामध्ये जियोकडून JioCinema, JioTV, JioSecurity आणि JioCloud सारख्या अ‍ॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन देण्यात येणार आहे
  • हा जियोचा पहिला 5G रिचार्ज प्लॅन म्हणता येईल कारण यामध्ये ग्राहकांना कंपनी 5G डेटा ऑफर करत आहे. तसेच कॉम्प्लिमेंट्री प्राईम मेंबरशिप नव्या ग्राहकांना मिळणार आहे

'Jio New Year Offer' कधी पर्यंत असेल?

जर तुम्हालाही या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर लवकरच रिचार्ज करा कारण कंपनी पुढील वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ही ऑफर बंद करणार आहे. परंतु यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यासंदर्भातील लास्ट डेट कुठेही सांगण्यात आलेली नाही.  

'749' रुपयांचा नवीन प्लॅन लाँच

जियोने अलीकडेच आणखी एक नवा प्लॅन सादर केला आहे. जियोने 90 दिवसांची वैधता असलेला एक नवीन रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी सादर केला होता. या रिचार्ज प्लॅनची किंमत 749 रुपये असून ज्यामध्ये रोज 2 GB, 5G इंटरनेट डेटा दिला जात आहे. तसेच दररोज 100 फ्री एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि जियो अ‍ॅप्सचा फायदा देखील घेता येणार आहे.