Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jindal Investment in Nashik: जिंदाल सॉ कंपनीची नाशिकमध्ये 175 कोटींची गुंतवणूक

Industry

Image Source : http://www.jindalsaw.com/

Jindal Investment in Nashik: जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीने नाशिकमध्ये 175 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अमेरिकेमध्ये मुख्यालय असलेल्या हंटिंग एनर्जी सर्व्हिसेस (Hunting Energy Services) सोबत जिंदालचे हे जॉईंट व्हेन्चर असणार आहे.

जिंदाल सॉ लिमिटेडने Oil Country Tublar Goods (OCTG) थ्रेडींग प्लांटमध्ये 175 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा प्लांट नाशिकमध्ये आधीपासूनच कार्यरत असलेल्या जिंदालच्या प्लांट्शी संलग्न असेल. अमेरिकास्थित Hunting Energy Services बरोबर याचे जॉईंट व्हेन्चर असणार आहे.

काय आहे OCTG

पेट्रोलियम उद्योगात वापरल्या जाणाऱ्या सामग्रीच्या निर्मितीसाठी ऑईल कंट्री ट्युबलर गुड्सचा (Oil Country Tublar Goods-OCTG) वापर केला जातो. तेल, वायू, विहिरी यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सीमलेस पाईपच्या माध्यमातून याचा वापर केला जातो.

निर्यातक्षम प्लांट 

OCTG मार्केटमध्ये पाईप्स, ट्यूबलर आणि प्रीमियम कलेक्शनचे उत्पादन आणि पुरवठा करण्यास सक्षम असलेली भारतातील एकमेव सुविधा आता या प्लांटच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत ही उत्पादने परदेशातून आयात करावी लागत होती. परंतु आता या प्लांटच्या रूपाने भारतातील तेल आणि वायू उद्योगाला तर मदत होईलच. शिवाय या उत्पादानात मोठ्या प्रमाणात निर्यात क्षमता देखील आहे.

1,000 लोकांना रोजगार 

हा प्लांट 1.30 लाख स्क्वेअर फूट जागेवर उभारला जात असून यामध्ये 50,000 मेट्रिक टन इतकी वार्षिक उत्पादन क्षमता आहे . या प्लांटच्या माध्यमातून जवळपास 1,000 लोकांना रोजगार मिळणार आहे.

नाशिक औद्योगिक क्षेत्रात उत्साह 

जिंदालच्या या नवीन प्रकल्पाच्या रूपाने नाशिकमध्ये निर्यातक्षम उत्पादन सुरु होणार असून अनेकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे . तेंव्हा नाशिककरांसाठी हि नक्कीच आनंदाची बाब आहे. मागच्याच आठवड्यात जनरल मिल्स या बेकरी प्रॉडक्ट बनविणाऱ्या जगविख्यात कंपनीने नाशिकमद्यध्ये 100 कोटींची गुंतवणूक केल्यानंतर आता जिंदाल सारख्या मोठ्या समूहाने नाशिकमध्ये नवीन उद्योग आणणे हि निश्चितच शहराच्या प्रगतीच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल आहे. 

‘निमा’कडून स्वागत 

'निमा'ने (Nashik Industries & Manufacturers Association-NIMA) कायमच नाशिकमध्ये येणाऱ्या नवनवीन उद्योग प्रकल्पांचं स्वागतच केलं असून जिंदालचा नाशिकमधील हा नवीन प्रकल्प ही नाशिकच्या उद्योगविश्वासाठी निश्चितच चांगली बातमी असल्याचे मत निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी 'महामनी'शी बोलताना व्यक्त केले. निमादेखील अशा जास्तीत जास्त व्यावसायिक गुंतवणुकीसाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नाशिकमधील सिन्नर, दिंडोरी या औद्योगिक क्षेत्रांचा विकास आणि नाशिकला इलेक्ट्रॉनिक मॅनुफॅक्चरिंग क्लस्टर बनविण्यासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.