गेल्या तीन आठवड्यांपासून भारतीय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या जवानने आता यूएसए बॉक्स ऑफिसवर टॉप 5 चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे. यशराज फिल्म्स यूएसए इंक. द्वारे रिलीज केलेला हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि यूएसएमध्ये तब्बल 12.1 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 100 कोटी रुपये जमा केले. विशेष म्हणजे, बॉक्स ऑफिस मोजोच्या मते, हा टप्पा केवळ 826 थिएटरमध्येच पूर्ण झाला आहे .
Table of contents [Show]
यूएसए बॉक्स ऑफिसच्या चार्टवर प्रतिष्ठेचे स्थान
जिथे यूएसए बॉक्स ऑफिसवर ‘द इक्वलायझर 3’ सारख्या आघाडीच्या चित्रपटांनी 613 कोटी त्यानंतर ‘The Nun II’ ने 469 कोटी कमाई केली. अशा मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा करत जवानाने तिथे 100 कोटींपर्यंत झेप घेतली आहे .यूएसए बॉक्स ऑफिसच्या चार्टवर स्थान मिळवणाऱ्या टॉप 5 चित्रपटांमध्ये जवानने एक प्रतिष्ठित स्थान मिळवले आहे.
जवानचे भारतातील बॉक्स ऑफिस कलेक्शन
Sacnilk website च्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, जवानाचे देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शन 493.63 कोटींवर पोहोचले आहे. आजच्या तिसर्या शनिवारी 17 व्या दिवशी चित्रपट 12 कोटींची कमाई करेल असा अंदाज आहे .
गदर 2 वर मात
शाहरुख खानचा जवान चित्रपट ऑगस्टमध्ये रिलीज झालेल्या सनी देओलच्या गदर 2 वर मात करणार असे दिसते आहे . 520.60 कोटी कमाईच्या आकड्यावर येईपर्यंत गदर 2 39 व्या दिवसापर्यंत पोहोचला होता .
जवानचे जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शन
बहुतेक परदेशी राष्ट्रांमध्ये जवान चित्रपटाला Adult certification देण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या परदेशातील कामगिरीवर मर्यादा आली आहे. तरीही युनायटेड किंगडम ,ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि भारतीय उपमहाद्वीपातील बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि मालदीव याठिकाणीही चित्रपटाचे चांगली कामगिरी केली आहे . तिसऱ्या आठवड्यात असूनही, चित्रपटाची कमाई कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
शाहरुख खानच्या चित्रपटाने 21 सप्टेंबरपर्यंत जगभरात 937.61 कोटी रुपये कमावले आहेत. ही आकडेवारी शेअर करताना गौरी खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने लिहिले कि , “बॉक्स ऑफिसवर हा धमाका आहे! आणि तो तुम्हाला चुकवायचा नाही!”