खासगी क्षेत्रातील जना स्मॉल फायनान्स बँकेच्या (Jana Small Finance Bank) ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एफडीवरील (FD) व्याजदरात बदल केले आहेत. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या एफडीसाठी व्याजदरात बदल करण्यात आले आहेत. हे नवे व्याजदर भारतीय खातेधारक आणि एन.आर.ओ (NRO) खातेधारकांसाठी आहेत. बँकेच्या नवीन व्याजदरानुसार सर्वसामान्य लोकांना एफडीवरील गुंतवणुकीसाठी 3.75% ते 6% व्याजदर देण्यात येत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या एफडीवरील गुंतवणुकीवर 4.25% ते 6.50% व्याज देण्यात येत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार नवीन व्याजदर हे 30 मे 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. या निमित्ताने बँक कोणत्या कालावधीसाठी किती व्याजदर देते, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
ज्येष्ठ नागरिकांना किती व्याज मिळते?
जना स्मॉल फायनान्स बँक (Jana Small Finance Bank) ज्येष्ठ नागरिकांना इतर एफडीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 50 बीपीएस जास्त व्याजदर देते. मात्र ही सुविधा केवळ भारतीय खातेधारक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मिळत आहे. तसेच 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी केलेल्या एफडीवर कर सवलतीचा लाभ (Tax Free Benefit) घेता येणार आहे. आयकरच्या 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत हा लाभ घेता येऊ शकतो.
बँकेचा सर्वाधिक व्याजदर जाणून घ्या
बँकेकडून सामान्य ग्राहकांना 366 दिवस ते 2 वर्ष कालावधीतील एफडीवर जास्तीत जास्त 8.5% व्याजदर देण्यात येत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना समान कालावधीसाठी हा व्याजदर 9% इतका आहे.
कोणत्या कालावधीसाठी किती व्याजदर मिळतोय, जाणून घ्या
7 दिवसापासून ते 14 दिवसातील एफडीसाठी बँकेकडून 3.75% व्याज देण्यात येत आहे. 15 दिवस ते 60 दिवसांच्या कालावधीतील एफडीवरील गुंतवणुकीवर 4.25% व्याज मिळत आहे. तसेच 60 दिवस ते 90 दिवसासाठी 5% हिशोबाने व्याज देण्यात येत आहे. 91 दिवस ते 180 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या एफडीसाठी बँकेकडून 6.25% व्याजदर देण्यात येत आहे.
'या' कालावधीसाठी मिळेल इतका व्याजदर
बँक 181 दिवस ते 364 दिवसांच्या एफडीवर ग्राहकांना 7% व्याजदर देत आहे. तर 1 वर्षात मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 7.25% व्याज देण्यात येत आहे. याशिवाय 366 दिवसापासून ते 2 वर्षापर्यंतच्या एफडीवरील गुंतवणुकीवर 8.50% सर्वाधिक व्याज देत आहे. 2 वर्ष ते 3 वर्ष कालावधीतील एफडीसाठी बँकेकडून 7.35% व्याज देण्यात येत आहे. याशिवाय 3 वर्ष ते 5 वर्ष कालावधीतील एफडीवर 7.25% व्याज आणि 5 वर्ष ते 10 वर्षाच्या कालावधीतील एफडी गुंतवणुकीसाठी 6% व्याज देण्यात येत आहे.
Source: hindi.moneycontrol.com