Crypto Scam: क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून झाले, कोट्याधीश अशा अनेक जाहिराती, मेसेज सोशल मिडियावर फिरत आहेत. मात्र क्रिप्टोच्या नावाखाली अनेक घोटाळे होत आहेत. जानेवारीच्या सुरुवातील जालना जिल्ह्यात क्रिप्टो फसवणुक केल्याबाबतच्या तब्बल 103 तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात के.टी एंटरप्रायझेसची चौकशी केली असून एकूण 30 जणांना ताब्यात घेतले आहे.
क्रिप्टो फसवणूक प्रकरणात, झाले 700 कोटींचे नुकसान
जालना जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांचा क्रिप्टोकरन्सी घोटाळा उघडकीस आला आहे. पोलिसांना एका दिवसात क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याशी संबंधित 101 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर आणखी दोन तक्रारी पुढे आल्याने आता एकूण तक्रारींची संख्या 103 झाली आहे. या तक्रारींमध्ये सुमारे 300 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र आता यात 700 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजत आहे, ही माहिती जालन्यातील स्थानिक वृत्तपत्रांनी दिली आहे.
किरण खरात आणि त्याची पत्नी दीप्ती खरात यांनी क्रिप्टो करन्सी जीडीसी कॉईनबाबत प्रचार केला होता, मोठी रक्कम परतावा म्हणून मिळेल असे वचन दिले होते. त्यांच्याच मार्फत 103 जणांनी गुंचृतवणूक केली होती. मात्र या दांमपत्याने त्यांना फसवले. हैद्राबाद पाठोपाठ महाराष्ट्रातील हा दुसरा सर्वात मोठा क्रिप्टो घोटाळा असल्याचे सांगितले जात आहे. या दाम्पचत्याने आणखीही नागरिकांना फसवले असल्याचे समजते आहे. सध्या केवळ 103 जणांनी पुढे येऊन आपली तक्रार दिली आहे. सध्या या दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यांची बँक खाती, क्रिप्टो खाती गोठवण्यात आलेली आहेत. पोलीस उपअधीक्षक भगवान फुंदे यांनी सांगितले की, सुमारे 10 हजार गुंतवणूकदारांसह हा घोटाळा 700 कोटी रुपयांपर्यंतचा असू शकतो, असा संशय विभागाला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
किरण खरात याला चार दिवस ओलिस ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी माजी राज्यस्तरीय क्रिकेटपटू विजय झोल आणि अन्य 20 जणांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले. क्रिकेटपटू विजय झोलने जीडीसी डिजिटल चलनात सुमारे 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. किरण खरात यांनी पोलिसांना सांगितलेल्या जवाबात म्हटले आहे की, तिला विजय जोळ यांच्या नावावर काही भूखंड हस्तांतरित करण्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. विजय जोळ हे माजी मंत्री आणि शिवसेना नेते (शिंदे गट) अर्जुन खोतकर यांचे जावई आहेत. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर आणि त्यांच्या साथीदारांनी किरण खरात यांना ओलीस ठेवून कायदा हातात घेतल्याचा आरोप केला. मात्र, अर्जुन खोतकर यांनी किरण खरात यांना वाचवल्याचा ठपका कैलास गोरंट्याल यांच्यावर ठेवला आहे.
सध्या या प्रकरणात नव्या 10 जणांना ताब्यात घेतले आहे. ज्यांनी खरात दाम्पत्याला फसवणूक करण्यात सहाय्य केले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. तर, के.टी. एंटरप्रायझेस या कंपनीचेही यात धागे दोरे आढळल्याचे समजते. या प्रकरणात अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण सर्वच जोडले गेलेले आहे. मात्र यातून सामान्य नागरिकांनी एकच धडा घेतला पाहिजे, मोठा परतावा मिळणार म्हणून कोणत्याही स्किममध्ये पैसे गुंतवू नयते, मग ते क्रिप्टो असो किंवा आणखी काही, असा सल्ला फुंदे यांनी दिला.