Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Revised ITR Return: टॅक्स रिफंड मिळाल्यानंतरही Revised ITR फाइल करता येतो का?

Revised ITR Return

Image Source : www.philippinetaxationguro.com

आयकर विभागाने आता रिटर्न भरण्याची सुविधा अत्यंत जलद केली आहे. रिटर्न फाइल केल्यानंतर दोन दिवसांतही अर्ज प्रोसेस करून तुम्हाला टॅक्स रिफंड दिला जातो. मात्र, जर तुम्ही रिटर्न फाइल करताना काही चूक केली असेल तर Revised ITR कसा फाइल कराल? रिफंड मिळाल्यानंतरही दुरूस्ती करून ITR फाइल करता येतो का? जाणून घ्या.

Mistake in ITR Return: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. त्यानंतर रिटर्न फाइल केल्यास 5 हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. तुमच्या रिटर्नमध्ये काही चूक असेल तर दुरूस्त (Revised ITR) करू शकता का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर 'हो' असे आहे. कधीपर्यंत तुम्ही दुरूस्ती करू शकता. रिफंड मिळाला असेल तरी दुरूस्ती करता येईल का? हे सविस्तर जाणून घ्या.

रिटर्नमध्ये चूक असल्यास

आयकर विभागाने आता रिटर्न भरण्याची सुविधा अत्यंत जलद केली आहे. रिटर्न फाइल केल्यानंतर दोन दिवसांतही अर्ज प्रोसेस करून तुम्हाला टॅक्स रिफंड मिळू शकतो. मात्र, जर तुम्ही रिटर्न फाइल करताना काही चूक केली असेल. (How to correct Mistake in ITR return) उत्पन्न दाखवायचे राहिले असेल किंवा एखादी वजावट क्लेम करण्यास विसरले असाल तर चिंता करू नका.

टॅक्स रिफंड मिळाल्यानंतर दुरूस्ती करता येईल का? 

रिटर्न फाइल केल्यानंतर तसेच टॅक्स रिफंड मिळाल्यानंतरही तुम्ही दुरूस्ती करून पुन्हा रिटर्न फाइल करू शकता. (Revised ITR Return) मूल्यांकन वर्ष संपण्याआधी तीन महिने म्हणजेच डिसेंबर 2023 पर्यंत तुम्हाला Revised ITR फाइल करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. 

itr-refund-internal-image-1.jpg

दुरूस्ती करण्याची अंतिम मुदत काय? 

ITR भरण्याची मुदत 31 जुलै 2023 आहे. त्यानंतर 31 डिसेंबर 2023 पर्यंत करदात्यांना दंड भरून ITR फाइल करता येईल. मुदतीआधी किंवा मुदतीनंतर केव्हाही तुम्ही रिटर्न भरला असेल तरी तुम्ही दुरूस्ती करू शकता. मात्र, 31 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख लक्षात ठेवा. (Revised ITR Return) दुरूस्तीनंतरही चूक असल्याचे लक्षात आल्यास पुन्हा अपडेट करून रिटर्न फाइल करता येईल. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. 

मुदतीनंतर आयटीआर भरण्यास दंड किती?

आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. या मुदतीनंतर जर रिटर्न फाइल करत असाल तर दंड भरण्यास तयार राहा. जर तुमचे उत्पन्न 2.5 ते 5 लाखांच्या दरम्यान असेल तर तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच जर तुमचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर 5 हजारापर्यंत दंड भरावा लागेल. 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्ही दंड भरून रिटर्न फाइल करू शकता.