Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Form : नवीन आयकर रिटर्न फॉर्ममध्ये अनेक बदल

ITR Form

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने जारी केलेल्या नवीन आयकर रिटर्न फॉर्ममध्ये (ITR Form – Income Tax Return Form) अनेक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) ते स्टॉक मार्केटशी (Share Market) संबंधित अनेक माहिती उघड करावी लागणार आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने जारी केलेल्या नवीन आयकर रिटर्न फॉर्ममध्ये (ITR Form – Income Tax Return Form) अनेक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) ते स्टॉक मार्केटशी (Share Market) संबंधित अनेक माहिती उघड करावी लागणार आहे. एकूणच आता तुमच्या प्रत्येक खर्चावर आणि गुंतवणुकीवर आयकर विभागाची नजर असणार आहे. त्यामुळे थोडीशी चूकसुद्धा जड जाऊ शकते. मात्र, नवीन फॉर्ममध्ये वैयक्तिक करदात्यांसाठी फारसा बदल झालेला नाही.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने यावेळी आयकर रिटर्न फॉर्म खूप लवकर अधिसूचित केले, जेणेकरून नंतर करदात्यांना आयटीआर भरताना गर्दीचा सामना करावा लागू नये. पूर्वी, आयटीआर फॉर्म सामान्यतः मे-जूनमध्ये यायचे, त्यामुळे जुलैमध्ये रिटर्न भरणाऱ्यांची मोठी गर्दी जमायची आणि तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागत असे. यावेळी फॉर्म लवकर आल्याने करदात्यांना 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष संपताच रिटर्न भरता येणार आहे. सीबीडीटीने रिटर्न भरण्याची शेवटची तारीख फक्त 31 जुलै 2023 निश्चित केली आहे.

आता ही माहितीसुद्धा द्यावी लागणार

  • नवीन आयटीआर फॉर्ममध्ये, शेअर बाजारातील इंट्राडे ट्रेडिंग वेगळे दाखवावे लागेल, ज्यामध्ये तुमची एकूण उलाढाल आणि त्यातून मिळणारा नफा समाविष्ट असेल.
  • ट्रस्टला दिलेल्या देणगीला आयकर कलम 80G अंतर्गत सूट देण्यात आली आहे, त्यामुळे आता देणगीदाराला एक युनिक नंबर टाकावा लागणार आहे.
  • जर कापलेला टीसीएस इतर कोणत्याही व्यक्तीशी संबंधित असेल, ज्याला तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहे, तर आता ते रिटर्न फॉर्ममध्ये देखील दाखवावे लागेल.
  • व्यापार्‍यांना आता निवडलेल्या रिजीमची माहिती द्यावी लागेल, जेणेकरुन ते पुन्हा नवीन रिजीममध्ये जाण्यापासून रोखता येईल.
  • जर तुम्ही क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केली तर त्यामुळे होणारा नफा किंवा तोटाही रिटर्नमध्ये सांगावा लागणार आहे.

डिजिटल मालमत्तेवर कर

  • क्रिप्टो व्यतिरिक्त, जर तुम्ही एनएफटी (NFT) किंवा इतर व्हर्च्युअल अँसेट खरेदी किंवा विकत असाल तर ती माहिती देखील आयटीआरमध्ये द्यावी लागेल.
  • ज्या करदात्यांनी याआधी नवीन रिजीम स्वीकारली होती, त्यांना आता ही माहिती आयटीआरमध्ये द्यावी लागणार आहे.
  • ज्यांनी परदेशी बाजारात किंवा संस्थात्मक गुंतवणूकदारांसोबत पैसे गुंतवले आहेत त्यांना ते आयटीआरमध्ये दाखवावे लागणार आहे.

भागीदार फर्मसाठी देखील विशेष नियम

  • नवीन रिटर्न फॉर्ममध्ये, जर एखाद्या भागीदारी फर्मने नवीन भागीदार जोडला असेल किंवा जुना निवृत्त झाला असेल तर त्याची देखील माहिती द्यावी लागेल आणि बदलाची तारीख देखील नमूद करावी लागेल.
  • जर तुम्ही नातेवाईक किंवा मित्रांकडून आगाऊ रक्कम घेतली असेल तर त्याची माहिती तुमच्या आयकर रिटर्न फॉर्ममध्ये देखील समाविष्ट केली जाईल.
  • कोणत्याही ट्रस्टची आधी केलेल्या गुंतवणुकीची माहिती देखील रिटर्न फॉर्ममध्ये समाविष्ट करावी लागणार आहे.
  • ट्रस्टला मिळालेल्या गुप्त देणग्यांचा खुलासाही आवश्यक झाला आहे. या रकमेवर विहित रकमेपेक्षा जास्त कर आकारला जाईल.
  • देणग्या घेणाऱ्या राजकीय पक्षांना आता रिटर्न फॉर्ममध्ये निवडणूक आयोगाकडून मिळालेली मान्यताही जाहीर करावी लागणार आहे.