Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Filling: इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्ममधील 3 बदल माहितीयेत का? ऐनवेळी धावपळ टाळण्यासाठी जाणून घ्या

Filing ITR

Image Source : www.kcredit.in

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्याआधी आयकर विवरणपत्र (रिर्टन) सादर केले नाही दंड होऊ शकतो. 2022-23 आर्थिक वर्षासाठीचा रिटर्न भरताना आयकर विभागाने ITR फॉर्ममध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. रिटर्न भरताना जर तुम्हाला हे बदल माहिती नसतील तर ऐनवेळी धावपळ होऊ शकते.

ITR Filling: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्याआधी आयकर विवरणपत्र (रिर्टन) सादर केले नाही दंड होऊ शकतो. (Changes in ITR form) 2022-23 आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरताना आयकर विभागाने ITR फॉर्ममध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. रिटर्न भरताना जर तुम्हाला हे बदल माहिती नसतील तर ऐनवेळी धावपळ होऊ शकते. या लेखात आपण हे महत्त्वाचे बदल कोणते ते जाणून घेऊया.

व्हर्च्युअल डिजिटल अॅसेटद्वारे मिळणारे उत्पन्न (Income From VDA)

करदात्यांना आता क्रिप्टोकरन्सी, नॉन फंजिबल टोकन (NFT) आणि इतर व्हर्च्युअल डिजिटल करन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. 1 एप्रिल 2022 आयकर कायद्यात यासंबंधी बदल केले आहेत. सेक्शन 194S नुसार क्रिप्टो व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नावर टीडीएसही लागू आहे.

व्हर्च्युअल डिजिटल करन्सीद्वारे आर्थिक वर्षात किती उत्पन्न मिळाले याची माहिती आयटीआर फॉर्ममध्ये समाविष्ट करावी लागणार आहे. हे उत्पन्न भांडवली नफा आहे की व्यवसायातून मिळालेला नफा आहे हे सुद्धा स्पष्ट करावे लागेल. जर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये जर तुम्ही क्रिप्टोकरन्सीद्वारे नफा मिळवला असेल तर त्यासंबंधित दस्तावेज जवळ ठेवा. गुंतवणूक तारीख आणि इतर माहिती फॉर्ममध्ये भरण्यासाठी लागू शकते. 

डोनेशन रेफरन्स नंबर अनिवार्य

जर तुम्ही आयकर कायद्यातील 80G नुसार राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थांना देणगी दिली असेल तर फक्त देणगीची पावती कर वजावटीसाठी पुरेशी ठरणार नाही. तुम्हाला Donation Reference Number (ARN) आयटीआर फॉर्ममध्ये द्यावा लागेल. हा नंबर देणे करदात्याला अनिवार्य करण्यात आले आहे. तुम्ही ज्या संस्थेला देणगी दिली त्या संस्थेने दिलेल्या पावतीवर हा क्रमांक असतो. जर तुम्ही हा क्रमांक दिला नाही तर कर वजावटीस पात्र ठरणार नाही.

ITR फॉर्ममधील इतर बदल

विशिष्ट परिस्थितीत करदात्याकडून TCS जमा केला जातो. लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीमद्वारे (LRS) पैसे पाठवत असाल तर बँकेकडून TCS कापून घेतला जातो. या कापून घेतलेल्या TCS चा दावा आयकर विवरणपत्र भरताना करदाते करू शकतात. सोबतच करदाता जर परदेशी संस्थांमध्ये गुंतवणूक करत असेल किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इनव्हेस्टर असेल तर सेबीकडील नोंदणी क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे.