ITR Filing: अनेक वेळा आयटीआर भरताना लोक छोट्या चुका करतात. त्यामुळे त्यांना आणखी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याकडे रिटर्न भरताना दुर्लक्ष केल्यास आयकर विभागाची नोटीसही येऊ शकते. असे तुमच्यासोबत होऊ नये म्हणून काय करावे? चुका करणे कसे टाळावे? कोण-कोणती माहिती देणे आवश्यक आहे? हे जाणून घ्या.
Table of contents [Show]
मुलांच्या खात्यांची माहिती द्या
जर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर कोणतीही गुंतवणूक केली असेल आणि त्यातून तुम्हाला उत्पन्न मिळत असेल, तर तुम्हाला आयकर रिटर्न भरताना त्याची नोंदणी करावी लागेल. अनेक वेळा असे घडते की, पालकांनी अल्पवयीन मुलांच्या नावाने बँक खाती उघडली आहे. त्याच्या नावावर गुंतवणूक केली आहे. परंतु तुमच्या एकूण करपात्र उत्पन्नामध्ये मिळालेले व्याज उत्पन्न समाविष्ट केले नसेल. तर महत्वाची माहिती लपवून ठेवल्यामुळे तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीसही मिळू शकते. परंतु हेच उत्पन्न आयटीआर भरतांना तुमच्या उत्पन्नात जोडून 1500 रुपयांचा लाभही तुम्ही घेवू शकता.
व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्न
जमा झालेले व्याज म्हणजे व्याजातून मिळणारे उत्पन्न देखील तुमचे उत्पन्न आहे. ज्यामध्ये मुदतपूर्तीनंतरच पेमेंट केले जाईल. परंतु यामध्ये टीडीएस कापला जाईल. त्यामुळे तुम्हाला तुमची सर्व गुंतवणूक ITR मध्ये भरावी लागेल.
बचत बँक खात्यावर मिळणारे व्याज
रिटर्न भरताना, लोक सहसा त्यांच्या एकूण उत्पन्नामध्ये बचत बँक खात्यातून मिळालेले व्याज समाविष्ट करणे विसरतात. कारण ते अल्प उत्पन्न समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्हाला हे देखील ITR समाविष्ट करावे लागेल. यामध्ये तुम्ही एका वर्षाच्या आत कलम 80TTA अंतर्गत दहा हजार रुपयांच्या सूटचा दावा करू शकता.
परदेशात केलेली गुंतवणुक
जर तुम्ही परदेशात गुंतवणूक केली असेल. तर आयटीआर भरताना तुम्हाला होल्डिंग्स, फॉरेन फंड्स, प्रॉपर्टी त्यात दाखवावी लागेल.
गुंतवणुकीवरील व्याज
परतावा रिटर्न भरताना, तुम्ही गुंतवणुकीवरील परतावा (उत्पन्न/व्याज) देखील दाखवला पाहिजे. जर तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्यात मिळणारे व्याज करमुक्त आहे. म्हणूनच तुम्हाला ते तुमचे उत्पन्न म्हणून दाखवावे लागेल.