ITR Filing Extension: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR retrun) भरण्यासाठी करदात्यांची गरबड सुरू आहे. रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. मात्र, अद्यापही लाखो करदात्यांनी रिटर्न फाइल केला नाही. अनेकांना असे वाटत आहे की, सरकार 31 जुलैनंतर रिटर्न फाइल करण्यासाठी मुदतवाढ देईल. मात्र, खरंच सरकार मुदतवाढ देणार आहे का? आयकर विभागाने तशी काही अधिकृत माहिती दिली आहे का? दे पाहू.
मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची कोणतीही घोषणा आयकर विभागाने अद्याप केली नाही. (ITR Filing Due date Extension) तसेच मागील आठवड्यात केंद्रीय महसूल विभागाचे सचिव संजय मल्होत्रा यांनी रिटर्न फाइलिंसाठी मुदत वाढ मिळणार नाही, असे सुतोवाच दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही मुदतवाढीची अपेक्षा न ठेवता तत्काळ आयकर भरून घ्यावा. अद्यापही 5 दिवस शिल्लक आहेत.
कोणाला मुदतवाढ मिळू शकते?
ज्या राज्यांमध्ये पुराने थैमाने घातले त्या राज्यातील वैयक्तिक करदाते आणि छोट्या व्यवसायिकांना रिटर्न फाइल करण्यासाठी मुदतवाढ मिळू शकते. आयकर विभाग आणि अर्थमंत्रालय असा निर्णय घेऊ शकते. उत्तराखंड, दिल्ली, हिमाचलप्रदेश, गुजरातचा काही भाग पुराने वेढला होता. या कालावधीत जनजीवन विस्कळीत झाले होते. या राज्यातील नागरिकांना रिटर्न फाइल करण्यासाठी मुदतवाढ मिळू शकते. मात्र, अद्याप तशी अधिकृत घोषणा झालेली नाही.
24 जुलैपर्यंत 4 कोटी नागरिकांनी ITR भरला आहे. यापैकी 3.81 कोटी आयटीआर इ-व्हेरिफाइड देखील झाले आहेत, असे ट्विट आयकर विभागाने केले आहे. शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी लवकरात लवकर रिटर्न फाइल करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
मुदतीनंतर आयटीआर भरताना दंड किती?
31 जुलै या मुदतीनंतर आयटीआर भरल्यास 5 हजार रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. जास्तीत जास्त 10 रुपये दंड होऊ शकतो. तसेच करावरती व्याजही भरावे लागेल. त्यामुळे वेळेत रिटर्न भरणे शहाणपणाचे ठरेल.