ITR Filing : आर्थिक वर्ष 2023-24 साठी ITR फाईल करणे सुरु झाले आहे. करदाते एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांचे आयटीआर (ITR) फाईल करु शकतात. आर्थिक वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षात कमावलेल्या उत्पन्नासाठी हे आयटीआर फाईल केले जाईल. तर पगारदार व्यक्तींना जूनच्या मध्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. कारण तोपर्यंत त्यांना फॉर्म 16 मिळणार नाही, आणि याशिवाय ते आयटीआर फाईल करु शकणार नाही. म्हणजे पगारदार कर्मचारी जूनच्या मध्यापासून ते 31 जूलै 2023 पर्यंत रिटर्न भरु शकतात.
भारतीय आयकर कायद्यानुसार विशिष्ट व्यक्ती आणि संस्थांनी प्रत्येक आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर आयकर विभागाकडे आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. विशिष्ट मुदतीनंतर आयकर भरल्यास विशिष्ट व्यक्तीवर किंवा त्या संस्थेवर दंड आकारल्या जातो.
काय आहेत नियम
- आयटीआर फाईल करण्याची शेवटची तारीख चुकली तर तुम्हाला 5 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. आयकर कायद्याच्या कलम 234 एफ नुसार हा दंड आकारल्या जाणार आहे. आणि जर का तुमचं उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असेल तर, हजार रुपये दंड भरावा लागेल.
- तसेच, शेवटच्या तारखेनंतर ITR भरल्यास तुम्हाला कलम 234 A अंतर्गत दरमहा 1 टक्का व्याज द्यावे लागेल.
- तुम्ही कुठेही गुंतवणूक केलेल्या पैश्यांमध्ये जर का तुम्हाला नुकसान झाले असेल तर, तर ते करदाते पूढच्या वर्षात दाखवू शकते. तर काही अटींची पूर्तता केल्यास करदात्यांना सूट मिळू शकते.