फॉर्म 16 हे आयकरासंदर्भातलं महत्त्वाचं दस्तावेज असलं तरी एखाद्या व्यक्तीला फॉर्म 16 प्रदान केला नाही तरीही ती व्यक्ती (महिला किंवा पुरूष) आयकर रिटर्न (ITR) भरू शकते. सर्वप्रथम एखाद्या व्यक्तीनं आपल्या उत्पन्नावर अवलंबून, महिला किंवा पुरूष याअंतर्गत येणारा टॅक्स स्लॅब (Tax slab) तपासायला हवा. सर्व पे स्लिप एकत्र करण्याचा तसंच करपात्र उत्पन्नाची गणना करण्याचा सल्ला दिला जातो. 26AS फॉर्मचा वापर करून भरावा लागणारा नेमका कर किती ते शोधावं.
Table of contents [Show]
26AS फॉर्म म्हणजे काय?
26AS फॉर्ममध्ये कापलेल्या रकमेची सविस्तर माहिती असते. म्हणजे करदात्याच्या उत्पन्नाच्या विविध स्रोतांमधून टीडीएस किंवा टीसीएस कापला जातो, त्याचे तपशील यात असतात. या माध्यमातून आगाऊ कर आणि कराची माहिती आणि करदात्यानं केले व्यवहार या माध्यमातून समजतात.
फॉर्म 16 नसेल तर कोणती कागदपत्रे हवीत?
26AS
हे एखाद्याला नियोक्त्यानं संपूर्ण आर्थिक वर्षात कापलेल्या टीडीएसचं मूल्यांकन करण्यास मदत करते
पे स्लिप
पगाराच्या स्लिप जमा कराव्यात
एचआरए, एलटीए पुरावा
एचआरए कपातीचा दावा करण्यासाठी, एखाद्यानं आयटीआर भरताना भाड्याच्या पावत्या जोडल्या आहेत की नाही, हे पाहावं
80D, 80C अंतर्गत कपातीसाठी गुंतवणुकीचा पुरावा
80C, 80D, 80E यासारख्या तरतुदींखाली कपातीसाठी दावा करण्यास योग्य असलेली गुंतवणूक
जर एखादी व्यक्ती 26AS फॉर्ममधल्या रकमेपेक्षा जास्त कर भरण्यास जबाबदार असेल तर त्या व्यक्तीला (स्त्री किंवा पुरूष) आयकर भरण्यापूर्वी अतिरिक्त रक्कम भरावी लागणार
26AS ई-फायलिंग पोर्टलवरून कसं डाउनलोड करावं?
- स्टेप 1 : ‘ई-फायलिंग’ पोर्टलवर लॉगऑन करावं - https://www.incometax.gov.in/iec/foportal/
- स्टेप 2 : 'माय अकाउंट' मेनूवर जावं आणि 'व्ह्यू फॉर्म 26AS (टॅक्स क्रेडिट)' या लिंकवर क्लिक करावं
- स्टेप 3 : डिस्क्लेमर वाचल्यानंतर 'कन्फर्म'वर क्लिक करावं, त्यानंतर यूझरला टीडीएस-सीपीसी (TDS-CPC) पोर्टलवर रिडायरेक्ट केलं जाईल.
- स्टेप 4 : या पोर्टलमधल्या युसेजचा अॅक्सेप्टन्स द्या. 'व्ह्यू टॅक्स क्रेडिट (फॉर्म 26AS)'नंतर 'प्रोसिड'वर क्लिक करावं
- स्टेप 5 : 'अॅसेसमेंट ईअर' आणि 'व्ह्यू टाइप' सिलेक्ट करावं, त्यानंतर 'व्ह्यू/डाउनलोड'वर क्लिक करावं
शेवटची तारीख काय?
2022-23 या आर्थिक वर्षात कमावलेल्या उत्पन्नासाठी आयकर दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै असणार आहे.
फॉर्म 16चं महत्त्व
नियोक्त्यानं म्हणजेच नोकरी देणाऱ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातला टीडीएस (Tax Deducted source) वजा केल्यानंतर हा फॉर्म दिला जातो. आयकर विभाकडून नियोक्त्यामार्फत फॉर्म 16 आपल्या कर्मचाऱ्यांना दिला जात असतो. कर्मचाऱ्यांच्या उत्पनानाचा पुरावा म्हणून हा फॉर्म वापरला जात असतो. एका वर्षात कर्मचाऱ्यानं नोकरी बदलली तरी त्याला कंपनीकडून हा फॉर्म मिळत असतो. कर्ज घ्यायचं असल्यास बँकादेखील फॉर्म 16ची मागणी करतात. अशा या महत्त्वाच्या दस्तावेजातली माहितीही अचूक असणं आवश्यक आहे. त्यात कोणतीही तफावत असता कामा नये. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कंपनीकडे या फॉर्मची मागणी नक्की करावी.