Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITI mutual fund NFO : आयटीआय म्युच्युअल फंडची नवी स्कीम, 5000 रुपयांपासून गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर...

ITI mutual fund NFO : आयटीआय म्युच्युअल फंडची नवी स्कीम, 5000 रुपयांपासून गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर...

ITI mutual fund NFO : आयटीआय म्युच्युअल फंडानं नवी योजना आणलीय. या माध्यमातून 5000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू होणार आहे. या फंडानं एनएफओ, आयटीआय फोकस्ड इक्विटी फंड सुरू करण्याची घोषणा केलीय. हा एनएफओ 29 मे 2023पासून सबस्क्रिप्शनसाठी सुरू झालाय.

आयटीआय फोकस्ड इक्विटी (ITI focused equity fund) या एनएफओमध्ये किमान गुंतवणूक 5000 रुपयांपासून सुरू होणार आहे. 29 मेला सुरू झालेलं सबस्क्रिप्शन 12 जून 2023पर्यंत असणार आहे. या नव्या फंडात 5,000 इतकी कमी आणि त्यानंतर 1 रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. धीमंत शहा आणि रोहन कोरडे यांच्या संयुक्त विद्यमानं या फंडाचं मॅनेजमेंट करण्यात येणार आहे. आयटीआय फोकस्ड इक्विटी फंडाला निफ्टी 500 टोटल रिटर्न इंडेक्सच्या तुलनेत बेंचमार्क केला जाईल

'एक कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ'

आयटीआय फोकस्ड इक्विटी फंड हा वेगवेगळ्या मार्केट कॅपिटलायझेशन असणाऱ्या 30 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा एक कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ आहे. हा फंड प्रामुख्यानं बाजार भांडवलातल्या 30 कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणार आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या माध्यमातून ज्या गुंतवणूकदारांना त्यांची संपत्ती वाढवायचीय त्यांच्यासाठी एनएफओ हा एक चांगला पर्याय आहे.

जोखीम घेण्याची क्षमता पूर्ण करणारी उत्पादनं

एनएफओ लाँच केल्याची घोषणा केल्यानंतर आयटीआ म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी राजेश भाटिया म्हणाले, की एक फंड हाऊस म्हणून आमचा प्रयत्न आहे की आम्ही असे प्रॉडक्ट घेऊन येवू ते गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता पूर्ण करतील. आयटीआय फोकस्ड इक्विटी फंड एक फोकस्ड पोर्टफोलिओ आहे आणि आम्हाला आशा आहे की आमच्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन अनेक क्षेत्रांच्या ग्रोथ ड्रायव्हर्स आणि ग्रोथ लीडर्सचा फायदा होईल. मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आणि चांगल्या गुंतवणुकीच्या सिद्धांतासह, आयटीआय म्युच्युअल फंड बाजारातली जोखीम स्वीकारण्याची क्षमता असणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याचं समाधान देण्यावर लक्ष केंद्रीत करते.

गुंतवणूकदारांसाठी आणले 17 मुख्य प्रवाहातले फंड

आयटीआय म्युच्युअल फंडान जवळपास 17 योजना 4 वर्षांच्या कालावधीत लाँच केल्या आहेत. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा चांगला अनुभव देण्यासाठी सतत कंपनी कार्यरत आहे. आयटीआ. म्युच्युअल फंडाची 57पेक्षा जास्त ठिकाणी शाखा किंवा कार्यालयं आहेत. तसंच देशभरात 21,209 वितरकांची (Distributers) पोहोच आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचं जोखीम कमी करण्याचं लक्ष्य असतं. ते या माध्यमातून पूर्ण होत असल्याचं सांगण्यात येतंय. ही योजना गुंतवणूकदारांना कशी वाटणार, हे 12 जूननंतरच समजणार आहे.

एप्रिल 2019मध्ये सुरुवात

एप्रिल 2019मध्ये आयटीआय म्युच्युअल फंडानं आपलं काम सुरू केलं. गुंतवणूकदारांसाठी 17 मुख्य प्रवाहातले म्युच्युअल फंड उत्पादनं बाजारात आणलीत. फंड हाऊसच्या माध्यमातून 22 मे 2023पर्यंत 4,011 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं व्यवस्थापन केलं जात आहे. टोटल एसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजेच AUMमधून इक्विटी AUMची हिस्सेदारी 3285 कोटी रुपये आहे. तर हायब्रिड आणि डेब्ट स्कीमची हिस्सेदारी 432 कोटी रुपये आणि 295 कोटी रुपये आहे. AUMचा भौगोलिक प्रसार पहिल्या 5 शहरांमध्ये 46.10 टक्के, पुढच्या 10 शहरांमध्ये 21.99 टक्के, पुढच्या 20 शहरांमध्ये 15.01 टक्के, पुढच्या 75 शहरांमध्ये 12.68 टक्के आणि इतरांमध्ये 4.22 टक्क्यांसह डायव्हर्सिफाइड आहे.