तुम्ही जर होम लोन, कार लोन किंवा गोल्ड लोन घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींना प्राधान्य द्यावेच लागेल. जसे की सर्वांत अगोदर तुम्ही इंटरनेटवर / गुगलवर चांगल्या स्कीम शोधा. त्यानंतर तुमचा फायनानशिअल सल्लागार आणि बँकर्स शोधा. तिसरी सर्वांत महत्त्वाची पायरी म्हणजे तुम्ही तुमचा फायनानशिअल मदतनीस निवडा. जो तुम्हाला यामध्ये सर्व प्रकारची मदत करू शकेल. यासाठी तुम्हाला NBFC (Non-Banking Financial Company)ची मदत होऊ शकते.साधारणपणे बँकांकडे स्वस्त दरात लोन उपलब्ध असते ; एवढीच माहिती आपल्याला असते आणि आपण नेमके इथेच चुकतो. कारण व्याज दराच्या जाहिरातीला किती प्राधान्य द्यायचे हे ठरवायला पाहिजे. खरं म्हणजे व्याजदर कसा आकारला जातो ही बाब फार महत्वाची आहे. म्हणून सर्वप्रथम त्यालाच पहिलं प्राधान्य द्यायला पाहिजे.
फिक्स व्याज
या प्रकारच्या कर्जामध्ये कर्जाच्या संपूर्ण कालावधीसाठी निश्चित केलेल्या शिल्लक रकमेवर व्याज आकारले जाते. उदाहरणार्थ , तुम्ही 10 लाख रूपयांचे कर्ज 8 टक्के दराने घेतले आहे आणि त्याचे समान 12 हप्त्यांमध्ये EMI भरायचे आहेत. अशा प्रकरणात , 12 महिन्यांसाठी संपूर्ण रकमेवर व्याज आकारले जाते . परिणामी प्रत्येक महिन्याचा EMI रुपये 90,000 आहे. यात 10 लाख रूपयांवर वर्षाचे व्याज रूपये 80,000 भागिले 12 महिने असा दर आकारला जातो. यात तुमच्या मूळ परतफेडीकडे दुर्लक्ष होते आणि तुमच्याकडून संपूर्ण वर्षभर व्याज आकारले जाते.
फ्लोटिंग व्याज
या पद्धतीनुसार कर्जाच्या संपूर्ण कालावधीत शिल्लक ज्याप्रमाणे कमी होईल. त्यानुसार त्या रकमेवर व्याज आकारले जाते. उदाहरणार्थ, तुम्ही 10 लाख रूपयांचे कर्ज 8 टक्के दराने 12 महिन्यांसाठी घेतले आहे. या 12 महिन्यांच्या कालावधीत मूळ रक्कम कमी होऊन शिल्लक रकमेवर व्याज आकारले जाते.
Months | EMI (Rs.) | Interest (Rs.) | Principal Repayment (Rs.) | Outstanding Principal (Rs.) |
0 | 1,000,000 | |||
1 | 86,988 | 6,667 | 80,322 | 919,678 |
2 | 86,988 | 6,131 | 80,857 | 838,821 |
3 | 86,988 | 5,592 | 81,396 | 757,425 |
4 | 86,988 | 5,049 | 81,939 | 675,486 |
5 | 86,988 | 4,503 | 82,485 | 593,001 |
6 | 86,988 | 3,953 | 83,035 | 509,965 |
7 | 86,988 | 3,400 | 83,589 | 426,377 |
8 | 86,988 | 2,843 | 84,146 | 342,231 |
9 | 86,988 | 2,282 | 84,707 | 257,524 |
10 | 86,988 | 1,717 | 85,272 | 172,252 |
11 | 86,988 | 1,148 | 85,840 | 86,412 |
12 | 86,988 | 576 | 86,412 | 0 |
Total | 1,043,861 | 43,861 | 10,00,000 |
कोणती पद्धत चांगली !
साहजिकच शिल्लक रकमेवर व्याज आकारणे ही पद्धत अधिक चांगली आहे. रिड्यूसिंग बॅलन्समध्ये , दैनंदिन रिड्युसिंग बॅलन्स सर्वोत्तम आहे. त्यानंतर मासिक आणि असेच आणखी इतर पर्याय आहेत. आपण खालील चार्टमध्ये दाखवल्यानुसार समान अटींवर 10 लाख रूपयांच्या कर्जासाठी 8 टक्के दराने व्याज दर आकारल्यावर त्याचे परिणाम EMI वर कसे दिसून येतात. हे आपण या चार्टमधून समजून घेऊ शकतो. तसे पाहायला गेले तर शिल्लक रकमेवर 8 टक्के दराने व्याज आकारले जाते जे प्रत्येक महिन्याच्या कपातीनंतर आकारल्या जाणाऱ्या 14.5 टक्के दराइतकेच आहे.
EMI अंतर्गत व्याज आकारण्याच्या वेगवेगळ्या पद्धती
नंतरच्या तुलनेत जास्तीत जास्त 50-60 टक्क्यांनी (म्हणजे 14 टक्के कमी करणारी शिल्लक ईएमआय 8 टक्के स्थिर शिल्लक कर्जापेक्षा स्वस्त आहे). परिणामी,आम्ही आमच्या वाचकांना सल्ला देतो की, केवळ दर पाहू नका तर कर्जाची निवड करताना EMIची गणना आणि पैसे कसे दिले जातात हे देखील समजून घ्या.