रस्त्यांवर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाला मोटार विमा, विशेषत: थर्ड पार्टी कव्हरेज असणे आवश्यक आहे. 1988 च्या मोटार वाहन कायद्यानुसार, भारतात मोटार वाहनाची मालकी किंवा मोटार वाहन चालवणाऱ्या कोणालाही थर्ड पार्टी इन्शुरन्स संरक्षण असणे आवश्यक आहे.थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम हा विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) ठरवते, विमा कंपन्या नाही.
Table of contents [Show]
- थर्ड पार्टी कार इन्शुरन्स म्हणजे काय? What is Third-Party car insurance?
- थर्ड पार्टी विमा कसे कार्य करतो? How it works?
- थर्ड-पार्टी दायित्व कव्हरची वैशिष्ट्ये (Features of Third-Party Liability Cover)
- नवीन थर्ड पार्टी विमा
- नवीन प्रायव्हेट कार - तीन वर्षांचा सिंगल प्रीमियम
- नवीन टू व्हीलर – पाच वर्षांचा सिंगल प्रीमियम
थर्ड पार्टी कार इन्शुरन्स म्हणजे काय? What is Third-Party car insurance?
आयसीआयसीआय लोमाबार्डच्या मते, "भारतात कार चालवण्यासाठी किमान किमान थर्ड पार्टी कार इन्शुरन्स संरक्षण असणे गरजेचे आहे. या विम्याअंतर्गत, थर्ड पार्टीला दायित्व कवच मिळते. त्यामुळे जेव्हा जेव्हा एखाद्या वाहनाचा रस्ता अपघात होतो, तेव्हा त्यात इतर कोणत्याही व्यक्तीचे शारीरिक किंवा त्याच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास थर्ड पार्टा इन्शुरन्स अंतर्गत भरपाई दिली जाते. सोप्या शब्दांत सांगायचे तर, हा तुमच्यात आणि तुमच्या विमा कंपनीतील एक करार आहे, जिथे विमा कंपनी तुमच्यावर खटला भरला गेला असेल किंवा एखादी व्यक्ती जखमी किंवा मृत झाली किंवा एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी कायदेशीररित्या जबाबदार आढळल्यास तुम्हाला नुकसान भरपाई देण्याचे मान्य करते."
थर्ड पार्टी विमा कसे कार्य करतो? How it works?
जर पॉलिसीधारकाचा अपघात झाला तर विमा कंपनी थर्ड पार्टीच्या मालमत्तेच्या दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठी पैसे देईल. त्यामुळे पॉलिसीधारकाचा आर्थिक भार कमी होतो. अपघात झाल्यास दावा सादर करण्यापूर्वी, विमाधारकाने विमा प्रदात्यास त्वरित सूचित करणे आवश्यक आहे. सर्वसमावेशक विमा आपल्या कारसाठी संपूर्ण संरक्षण प्रदान करतो, परंतु थर्ड पार्टी वाहन विमा केवळ आपल्या कारचा अपघातात सहभाग असल्याने उत्तरदायित्वापासून आपले संरक्षण करतो ज्यामुळे थर्ड पार्टीच्या मालमत्तेचे नुकसान, वैयक्तिक इजा किंवा चुकीने मृत्यू होतो.
थर्ड-पार्टी दायित्व कव्हरची वैशिष्ट्ये (Features of Third-Party Liability Cover)
- थर्ड पार्टी लीगल कव्हर कायद्याने बंधनकारक आहे.
- हे आपल्या कारमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई थर्ड पार्टीला देते.
- जर एखादी तिसरी व्यक्ती शारीरिकरित्या जखमी झाली असेल तर पॉलिसीत त्यांचा वैद्यकीय खर्च भागवला जाईल.
- जर एखाद्या अपघातामुळे तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा तो कायमचा अपंग झाला आणि यामध्ये आपल्या कारचा समावेश असल्यास, पॉलिसी एकरकमी रक्कम देईल.
वाहन प्रकार (खासगी गाड्या) | प्रीमियम दर (रु.) |
1000 सीसीपेक्षा कमी | 2,094 |
1000 सीसीपेक्षा जास्त परंतु 1500 सीसीपेक्षा कमी | 3,416 |
1500 सीसीपेक्षा जास्त | 7,897 |
वाहन प्रकार (टू व्हीलर ) | प्रीमियम दर (रु.) |
75 सीसीपेक्षा कमी | 538 |
75 सीसीपेक्षा जास्त पण 150 सीसीपेक्षा कमी | 714 |
150 सीसीपेक्षा जास्त पण 350 सीसीपेक्षा कमी | 1,366 |
350 सीसीपेक्षा जास्त | 2,804 |
वाहन प्रकार | प्रीमियम दर (रु.) |
1000 सीसीपेक्षा कमी | 6,521 |
1000 सीसीपेक्षा जास्त परंतु 1500 सीसीपेक्षा कमी | 10,640 |
1500 सीसीपेक्षा जास्त | 24,596 |
वाहन प्रकार | प्रीमियम दर (रु.) |
75 सीसीपेक्षा कमी | 2,901 |
75 सीसीपेक्षा जास्त पण 150 सीसीपेक्षा कमी | 3,851 |
150 सीसीपेक्षा जास्त पण 350 सीसीपेक्षा कमी | 7,365 |
350 सीसीपेक्षा जास्त | 15,117 |