येत्या उन्हाळ्यात तुम्हाला भारताचे नंदनवन काश्मीरचे (Kashmir) सौंदर्य पाहायचे असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. वास्तविक, आयआरसीटीसीने तुमच्यासाठी खास एअर पॅकेज लॉन्च केले आहे. आयआरसीटीसीने या पॅकेजला (IRCTC Tour Package) 'कश्मीर हेवन ऑन अर्थ एक्स मुंबई' असे नाव दिले आहे. या पॅकेजद्वारे, IRCTC श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगामच्या सुंदर मैदानी पर्यटनाची ऑफर देत आहे.
काश्मीरचे हे टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांचे आहे. हा हवाई दौरा मुंबईपासून सुरू होईल ज्यामध्ये तुम्ही मुंबईहून श्रीनगरला जाल. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगामला भेट दिल्यानंतर पर्यटकांना विमानाने मुंबईत आणले जाईल. ही सहल ठराविक अंतराने चालते. या पॅकेजचा प्रवास 9, 16, 19, 23 आणि 30 एप्रिल 2023 रोजी सुरू होईल. तुम्ही यापैकी कोणतीही तारीख निवडू शकता.
नाश्ता आणि रात्रीचे जेवण
या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला रात्रीच्या मुक्कामासाठी डयुलक्स हॉटेलची सुविधा मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला नॉन एसी वाहनाने काश्मीरमधील विविध ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. IRCTC वेबसाइट irctctourism.com वर जाऊन या टूर पॅकेजसाठी बुकिंग करता येईल.
टूर पॅकेज हायलाइट्स
- पॅकेजचे नाव - काश्मीर हेवन ऑन अर्थ एक्स मुंबई (WMA50)
- निघण्याची तारीख – 9, 16, 19, 23 आणि 30 एप्रिल 2023
- डेस्टिनेशन कव्हर - श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम
- दौऱ्याचा कालावधी - 5 रात्री आणि 6 दिवस
- ट्रॅव्हल मोड – फ्लाइट
पॅकेजचे भाडे
पॅकेजच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, कंम्फर्ट क्लासमध्ये ट्रिपल ऑक्युपेन्सीसाठी प्रति व्यक्ती खर्च 42,000 रुपये आहे. डबल ऑक्युपेन्सीवर प्रति व्यक्ती 43,300. तर सिंगल ऑक्युपेन्सीसाठी प्रति व्यक्ती किंमत रु 59,800 आहे. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी बेडसह 39,400 रुपये आणि 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी 34,400 रुपये शुल्क आहे. याशिवाय बेडशिवाय 2 ते 4 वर्षांच्या मुलासाठी 26,800 रुपये शुल्क आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            