देशात बहुतांश ठिकाणी उन्हाळ्यात तापमान वाढते. यामुळे या ऋतूमध्ये लोक प्रामुख्याने थंड हवेच्या ठिकाणांना भेट देतात. हे लक्षात घेत आयआरसीटीसी या कंपनीने हिमाचल टूर पॅकेजची घोषणा केली आहे. या सहलीची सुरुवात मुंबईपासून होणार आहे. मुंबई ते चंदीगड असा विमान प्रवास केल्यानंतर रेल्वेने हिमाचलच्या प्रवासाला सुरुवात होते. IRCTC'च्या या टूर पॅकेजेसबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या.
हिमाचलच्या टूरची सुरुवात मुंबईपासून होणार आहे. मुंबईहून पर्यटक विमानाने चंदीगडला पोहोचतील.विमानतळावरुन सर्व ग्रुप शिमलासाठी रवाना होईल. या प्रवासात पर्यटकांना पिंजोर गार्डनची सैर केली जाईल. शिमल्यात पोहोचल्यावर, पर्यटक थेट हॉटेलमध्ये चेक इन करतील.
Table of contents [Show]
दुसरा दिवस
मुंबई ते शिमला या प्रवासात पहिला दिवस गेल्यानंतर पर्यटक सकाळचा नाश्ता करून कुफरीकडे रवाना होतात. शिमल्याच्या रम्य पर्वतरांगांमध्ये कुफरी नामक एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. येथील बर्फाच्छादित पठारांवर लोक स्लेज आणि पोनी राईड तसेच, स्नो राईडचा आनंद घेऊ शकतात. मॉल रोड, स्कँडल पॉइंट, शिमला मशीद, क्राईस्ट चर्च, गेटी थीएटर यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणी लोक मनमुराद आनंद घेऊ शकतात.
तिसरा, चौथा आणि पाचवा दिवस
सहलीच्या तिसऱ्या दिवशी पर्यटक मनालीला रवाना होतील. वाटेत पांडोह धरण आणि हनोगी माता मंदिर येथे भेट देऊन मनाली येथील हॉटेलमध्ये पर्यटक रात्रीचे जेवण व विश्रांती घेतील. यानंतर सहलीच्या चौथ्या दिवशी हडिंबा मंदिर, मनू मंदिर, वशिष्ठ स्नान, वन विहार, तिबेटी मठ, क्लब हाऊस या प्रत्येक ठिकाणी पर्यटक भेट देतील. पाचव्या दिवशी पर्यटक रोहतांग पास येथील स्नो पॉइंटमध्ये आनंद घेतील.
सहलीचा शेवटचा 6वा दिवस
हिमाचल सहलीच्या सहाव्या व अंतिम दिवशी पर्यटक हॉटेलचा निरोप घेऊन चंदीगढ येथे रवाना होतील. वाटेत कुलू व वैष्णोदेवी या लोकप्रिय स्थळांना भेट देऊन पर्यटक विमानतळाकडे जातील आणि या प्रवासाची सांगता होईल.
एकूण प्रवासभाडे
IRCTC च्या या हिमाचल टूर पॅकेजसाठी पर्यटकांना 44,000 भाडे द्यावे लागेल. यात पर्यटकांना हिमाचलमध्ये 7 दिवस आणि 6 रात्री राहण्याची व फिरण्याची सुविधा उपलब्ध होईल. IRTC'च्या अधिकृत वेबसाइटवर टूर पॅकेज संदर्भात अधिक माहिती मिळेल.
(www.hindimoneycontrol.com)