Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इराण स्वत:चे 'क्रिप्टो-रियाल' लाँच करण्यास सज्ज

इराण स्वत:चे 'क्रिप्टो-रियाल' लाँच करण्यास सज्ज

Image Source : www.earth.org

इराण देश स्वत:ची सेंट्रल बॅंक ऑफ डिजिटल करन्सी (CBDC) सुरू करणार असून इराणकडून क्रिप्टो-रियालसाठी नियामक फ्रेमवर्क जाहीर करण्यात आले. सेंट्रल बँक ऑफ इराणकडून क्रिप्टो-रियाल (Crypto-Rial) या डिजिटस करन्सीचे वितरण होणार आहे.

जगभरात क्रिप्टोकरन्सीमध्ये (Crypto Currency) गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इराण देशाने स्वत:ची डिजिटल करन्सी आणण्याची घोषणा केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इराण (Central Bank of Iran)ने त्या संदर्भात देशातील सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना सेंट्रल बँक ऑफ डिजिटल करन्सी (CBDC)च्या म्हणजेच क्रिप्टो-रियाल या डिजिटल करन्सीच्या नियामक फ्रेमवर्कबद्दल अधिसूचना जारी केली आहे.

सेंट्रल बॅंक ऑफ इराणने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत डिजिटल चलनाचे वितरण कसे करणार आणि त्याची नियमावली दिली आहे. क्रिप्टो-रियाल ही डिजिटल करन्सी सेंट्रल बँक ऑफ इराणद्वारे तयार केली जाणार असून त्याचा पुरवठा आणि नियंत्रण याचे नियमन याच संस्थेकडून केले जाणार आहे. याचबरोबर ही डिजिटल करन्सी कशाप्रकारे बाजारात आणली जाईल. त्याचा वापर कसा करणार. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी, प्रणाली आणि अधिकृत वित्तीय संस्था याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

क्रिप्टो-रियाल ही करन्सी जगातील इतर डिजिटल करन्सींशी स्पर्धा करणार नसल्याचे सेंट्रल बॅंक ऑफ इराणने स्पष्ट केले आहे. त्यांना सध्या या करन्सीचा भाग असलेल्या वित्तीय संस्थांना अधिकृत करणे आणि नवीन करन्सीच्या परिणामांचे मूल्यांकन करणे यावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे म्हटले आहे. या करन्सीच्या व्यवहारासाठी शुल्क किती आकारले जाणार याबाबत अजून माहिती देण्यात आलेली नाही.

या राष्ट्रीय चलनाची सुरूवात स्थानिक बँकिंग प्रणाली आणि पेमेंट सेवा नेटवर्कच्या ऑटोमेशनचा एक भाग असल्याचे बॅंक ऑफ इराणने म्हटले आहे. 2018 मध्ये, इन्फॉर्मेटिक्स सर्व्हिसेस कॉर्पोरेशन (ISC) ला नवीन राष्ट्रीय क्रिप्टोकरन्सी तयार करण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यानुसार सेंट्रल बॅंक ऑफ इराणने जानेवारीपर्यंत सेंट्रल बँक ऑफ डिजिटल करन्सी (CBDC) प्रकल्पाची घोषणा करणार असल्याचे जाहीर केले होते.

सेंट्रल बँक ऑफ डिजिटल करन्सी (CBDC)

जागतिक स्तरावर सेंट्रल बँक ऑफ डिजिटल करन्सीबाबत (CBDC) जागृतता निर्माण झाली आहे. अनेक देशांनी त्यानुसार आपल्या योजना आखल्या असून स्वतःच्या डिजिटल करन्सी लॉन्च करण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत. बँक ऑफ जमैकाने अलीकडेच आर्थिक नियामक सँडबॉक्स अंतर्गत प्रोटोटाइप CBDC ची चाचणी करण्याची योजना जाहीर केली.

चीनी सरकारने यापूर्वीच डिजिटल युआन आणण्यासाठी चाचणी सुरू केली आहे. डिजिटल युआन लाँचिंगनंतर अमेरिकन डॉलरची जागा घेऊ शकेल, अशी चर्चा सुरू आहे. तर अमेरिकेने अजून डिजिटल डॉलर लॉंच करण्याबाबत कोणतीच घोषणा केलेली नाही.