भांडवली बाजाराच्या इतिहासातील देशातील सर्वात मोठ्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC)च्या आयपीओनंतर येत्या आठवड्याभरात वेल्थ मॅनेजमेंट आणि कन्सलटन्सी क्षेत्रातील प्रुडन्ट कॉर्पोरेट अॅडव्हायझरी सर्व्हिसेस (prudent corporate advisory services ltd), गुरगांवमधील स्टार्टअप कंपनी डेलीव्हेरी (Delhivery) आणि गुजरातमधील स्टेनलेस स्टील पाईप्स आणि ट्यूब्स बनवणाऱ्या विनस पाईप्स अॅड ट्यूबस (Venus Pipes & Tubes) या कंपन्यांचा आयपीओ येत आहे.
आयपीओ म्हणजे काय? What is IPO?
सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास विविध कंपन्यांकडून निधी उभारणीसाठी अवलंबला जाणारा पर्याय म्हणजे आयपीओ (IPO), असे म्हणता येईल. एखादी कंपनी जेव्हा प्रथमच त्यांचे शेअर्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देते, त्या प्रक्रियेला आयपीओ म्हटले जाते. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपन्यांकडून आयपीओ आणून निधी जमा केला जातो.
'3 ??? ??? ??????? ??????? 'OPEN ON 10-11 MAY 2022
Like | Share | Retweet#PRUDENT #VENUS #DELHIVERY #TinkerbeLL #IPO For letest GMPJoin
Twitter https://t.co/NtjsZt6Fwt
Telegram https://t.co/dljPhgB3PX pic.twitter.com/rP2xkcRqcG— TinkerbeLL_IPO (@TinkerbeLL_IPO) May 9, 2022
प्रुडन्ट कॉर्पोरेट अॅडव्हायझरी सव्र्हिसेस कंपनीचा आयपीओ प्रति समभाग 595 ते 630 रूपये या किमतीने 10 मे पासून खुला होणार असून तो 12 मे पर्यंत सुरू राहणार आहे. आयपीओतून प्रुडन्ट कंपनीला 539 कोटी रूपयांचे भांडवल उभारणे अपेक्षित आहे. कंपनी 85,49,340 समभाग विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे.
डेलीव्हेरी (Delhivery) या लॉजिस्टिक फर्मच्या समभागांची विक्री 11 मेपासून खुली होणार असून 13 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे. कंपनीने प्रति समभागांची किंमत 462 रूपये ते 487 रूपये अशी निश्चित केली आहे. समभाग विक्रीतून कंपनीने 5,235 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आयपीओच्या माध्यमातून 4 हजार कोटी रुपयांच्या नवीन समभागांची विक्री करण्यात येणार आहे.
विनस पाईप्स अॅड ट्यूबस (Venus Pipes & Tubes) या कंपनीचा आयपीओ 165 कोटी रुपयांचा असून प्रति समभागांची किंमत 310 ते 326 रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे. हा आयपीओ 11 मे रोजी उघडणार असून 13 मे पर्यंत सुरू राहील. याचा लॉट साईज 46 समभागांचा असेल. तसेच कंपनीकडून आयपीओद्वारे 50.74 लाख नवीन शेअर्स विक्रीसाठी खुले ठेवले जाणार आहेत.
Image Source - https://bit.ly/3FndL5g