Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPL Online Ticket Price: आजपासून IPL चा धमाका, तिकिटांची किंमत आणि ऑनलाईन बुकिंगची प्रोसेस समजून घ्या

IPL 2023

IPL 2023 Online Ticket Booking: आयपीएल मॅच बघण्यासाठी वेगवेगळे दर आहेत. यातील सर्वात स्वस्त तिकिट गुजरात टायटन्सचे होम ग्राउंड असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरचे आहे. या मैदानावर प्रेक्षकांना फक्त 400 रुपयांत आयपीएलचा आनंद घेता येणार आहे. मुंबईतील किमान तिकिट दर हा इतर मैदानांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर किमान तिकिटाचा दर 2500 रुपये इतका आहे.

महिलांच्या IPL नंतर आज 31 मार्च 2023 पासून देशात पुरुषांची इंडियन प्रिमीयर लीग सुरु होणार आहे. देशातील वेगवेगळ्या स्टेडियमवर 'आयपीएल' 2023 च्या 70 मॅचेस होणार आहेत. या मॅचेसचे किमान तिकिट 400 रुपयांपासून 35000 रुपयांच्या दरम्यान आहे. आयपीएल मॅचचे खानपान-सेवेसह सिझन तिकिट उपलब्ध आहे. या तिकिटावर सहा मॅचेसचा आनंद लुटता येईल. आयपीएल तिकिटांची विक्री वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन होणार आहे. (IPL 2023 Online Ticket Price and Booking Process)

IPL 2023 सिझनचा पहिला सामना गतविजेते गुजरात टायटन्स आणि चार वेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघात होणार आहे. आयपीएलमधील  प्रत्येक संघाने तिकिट विक्रीसाठी स्वतंत्र कंपनीशी करार केला आहे. ही तिकिटे त्या कंपनीच्या वेबसाईटवरुन खरेदी करता येणार आहेत. त्याशिवाय स्टेडियमवर देखील तिकिटांची विक्री होणार आहे. आयपीएल 2023 ची स्पर्धा जिओ सिनेमा या अॅपवर निशुल्क दाखवण्यात येणार आहे. 

आयपीएलच्या ऑनलाईन तिकिट विक्रीसाठी राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स या  बुकमायशोबरोबर (Bookmyshow) तिकिट विक्रीसाठी करार केला आहे. चेन्नई सुपर किंग्जने TBA  या कंपनीशी करार केला आहे. गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जाइंट्स, पंजाब किंग्ज आणि सनराईज हैदराबाद, दिल्ली कॅपिटल या संघांनी पेटीएम इन्सायडर (PaytmInsider) या कंपनीशी तिकिट विक्रीसाठी करार केला आहे. रॉयल चॅलेंजर बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल या दोन संघांच्या वेबसाईटवरुन देखील प्रेक्षकांना तिकिटे खरेदी करता येतील.

ipl-ticket-price.jpg

आयपीएल मॅच बघण्यासाठी वेगवेगळे दर आहेत. यातील सर्वात स्वस्त तिकिट गुजरात टायटन्सचे होम ग्राउंड असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरचे आहे. या मैदानावर प्रेक्षकांना फक्त 400 रुपयांत आयपीएलचा आनंद घेता येणार आहे. मुंबईतील किमान तिकिट दर हा इतर मैदानांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर किमान तिकिटाचा दर 2500 रुपये इतका आहे. याशिवाय 5000, 10000, 20000 आणि 35000 रुपयांची तिकिटे देखील आहेत. मुंबई इंडियन्सने  आयपीएल मॅचसाठी सिझन तिकिट देखील उपलब्ध केले आहे. खानपान सेवेसह मुंबईच्या सहा मॅचेससाठी सिझन तिकिटाचा दर 20000 रुपये इतका आहे.

मुंबई इंडियन्सच्या महत्वाच्या मॅचेसची संपूर्ण तिकिटांची विक्री झाली आहे. ज्यात होम ग्राऊंडवरील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग या मॅचची ऑनलाईन तिकिटे अवघ्या 30 मिनिटांत विक्री झाली. येत्या 8 एप्रिल 2023 रोजी हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मुंबई इंडियन्सच्या तिकिट विक्रीला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. 

आयपीएल फ्रॅंचायजी होणार मालामाल (IPL Franchise Ticket Revenue Will Rise) 

आयपीएल यंदा कोरोना संबधीचे निर्बंध नसल्याने स्टेडियमध्ये प्रेक्षकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मागील तीन वर्ष कोरोनामुळे आयपीएल मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक संख्येवर मर्यादा होती.यंदा निर्बंध नसल्याने प्रेक्षक मोठ्या संख्येने स्टेडियमध्ये येतील, असा विश्वास संघांनी व्यक्त केला आहे. कोव्हीड पूर्वी तिकिट विक्रीतून प्रत्येक आयपीएल फ्रॅंचायजीला किमान 400 कोटींचा महसूल मिळाला होता. यंदा त्याहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या शुभारंभाच्या सामन्याची 90% तिकिटे हातोहात विक्री झाली आहेत. चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टाययन्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यात महेंद्र सिंग धोनी खेळणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 

MI च्या मॅचसाठी असा असेल तिकिट दर (MI Ticket Price)

मुंबई इंडियन्सचे आयपीएल सामने वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. मुंबईचा पहिला सामना चेन्नई सुपर किंगबरोबर 8 एप्रिल रोजी संध्याकाळी होणार आहे. या  सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवरील सचिन तेंडुलकर स्टॅंड, दिलीप वेंगसरकर स्टॅंडमधील तिकिटांचा दर 3500 रुपयांपासून आहे. गरवारे स्टॅंड, सचिन तेंडुलकर स्टॅंड, दिलीप वेंगसरकर स्टॅंड, सुनील गावस्कर स्टॅंड ,विजय मर्चंट स्टॅंड यामधील काही रांगासाठी तिकिट दर 4150 रुपये इतका आहे. गरवारे स्टॅंडमधील काही रांगासाठी तिकिट दर 4950 रुपये आहे. सचिन तेंडुलकर स्टॅंड, दिलीप वेंगरसकर स्टॅंड, ग्रॅंड स्टॅंडमधील काही रांगासाठी 9200 रुपये तिकिट दर आहे. मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी स्टेडियममध्ये फॅन्स झोन राखीव ठेवण्यात आले आहेत. फॅन्सझोनमधील तिकिटावर एक टीशर्ट मोफत दिले जाणार आहे. मुंबई इंडियन्सच्या ऑनलाईन तिकिटांवर बुकमायशोकडून किमान 240 रुपये बुकिंग फि लागू केली जाते. त्यावर 18% जीएसटी लागू केला जातो.

तिकिटांची अशी करा ऑनलाईन बुकिंग (How To Book Ticket Online)

  • पेटीएम इन्सायडर या वेबसाईटवर जा
  • ‘Magazine’ या पर्यायात Tata IPL पर्याय निवडा
  • IPL टीमची निवड करा
  • कोणती मॅच पाहणार आहात त्याची निवड करा.
  • तिकिट शुल्काची निवड करा
  • समोर आलेल्या स्टेडियममधील आसन व्यवस्थेनुसार सीटची निवड करा.
  • मोबाईल नंबर सादर करा आणि पेमेंट करा
  • ई तिकिटाचे नंबर तुमच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होतील. 

    Bookmy Show
  • बुकमायशो वेबसाईटवर जा.
  • स्पोर्टसचा पर्याय निवडा.
  • कोणता सामना पाहायचा आहे त्याची निवड करा.
  • बुकचा पर्याय क्लिक करा. 
  • तिकिटांची संख्या निवडा. 
  • स्टॅंडची निवड करा आणि आसन निवडा, 
  • पेमेंट करा. 


    (News Source : ET)