Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

iPhone 14 Plus Discount On Flipkart: फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेजमध्ये iPhone 14 मिळतोय बंपर डिस्काउंट

iPhone

iPhone 14 Plus Discount On Flipkart: iPhoneला जगभरात मागणी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार म्हणून iPhoneकडे पाहिले जाते. याच आयफोनच्या iPhone 14 Plus या मॉडेलवर फ्लिपकार्टने बंपर ऑफर जाहीर केला आहे.

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर सध्या बिग सेव्हिंग डेजचा सेल सुरु आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स टीव्ही, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर खासकरुन स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट देण्यात आला आहे. आयफोन प्रेमींसाठी बिग सेव्हिंग डेचा सेल मोठी बचत करणारा ठरणार आहे. कारण या सेलमध्ये iPhone 14 Plusवर तब्बल 16000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला आहे.

iPhoneला जगभरात मागणी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार म्हणून iPhoneकडे पाहिले जाते. याच आयफोनच्या iPhone 14 Plus या मॉडेलवर फ्लिपकार्टने बंपर ऑफर जाहीर केला आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज 15 जुलैपासून सुरु झाला असून 19 जुलैपर्यंत ग्राहकांना डिस्काउंटमध्ये शॉपिंग करता येणार आहे.

आयफोनचे लेटेस्ट मॉडेल असलेल्या iPhone 14 Plus वर 16000 रुपयांचा कॅश डिस्काउंट देण्यात आला आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजमधील डीलनुसार iPhone 14 Plus चे 182 जीबी स्टोरेज असेलेल्या बेस मॉडेलची किंमत 73990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या फोनची मूळ किंमत 89990 रुपये इतकी आहे. iPhone 14 Plus सिरिजमधील टॉप मॉडेलची किंमत 103999 रुपये इतकी असल्याचे फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर दर्शवते.

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजमध्ये कॅश डिस्काउंटसह 35000 रुपयांचा बोनस डिस्काउंट देखील देण्यात आला आहे. ग्राहकांना जुना स्मार्टफोन बदली करुन त्याऐवजी नवी फोन डिस्काउंटसह खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये अॅक्सिस बँक क्रेडीट आणि डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना किंवा ईएमआयचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त 10% किंवा 1000 रुपयांपर्यंत आणखी सवलत दिली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

iPhone 14 Plus ची वैशिष्ट्ये

  • iPhone 14 Plus हे आयफोन 14 चे अपडेटेड आणि लेटेस्ट व्हर्जन आहे. 
  • iPhone 14 Plus चा 6.7 इंचाचा रेटिना डिस्प्ले आहे. 
  • यात A15ची सुधारित बायोनिक चिप बसवलेली आहे.
  • iPhone 14 Plus मध्ये 512 जीबीचा स्टोरेज पर्याय उपलब्ध आहे. 
  • या फोनमध्ये 12 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आहेत. 
  • एक मुख्य कॅमेरा आणि एक अल्ट्रा वाईड लेन्स कॅमेरा यांचा समावेश आहे. 
  • iPhone आणि iPhone 14 Plus या दोन्ही फोनमध्ये iOS प्री इन्स्टॉल्ड आहे. 
  • फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजमध्ये iPhone 14 Plus ची किंमत 73999 रुपये ते 103999 रुपये या दरम्यान असेल.