Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment In 2023: नव्या वर्षात गुंतवणूक करताना 'या' जागतिक घडामोडींवर ठेवा लक्ष

Investment tips for new year

नूतन वर्षात जर तुम्ही गुंतवणूकीचा संकल्प करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील. २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध, महागाई बाजारातील चढ उतार अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढील वर्षीही देश आणि जागतिक पातळीवर अनिश्चतता राहू शकते. अशा परिस्थितीत कोणत्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पुढील वर्षी गुंतवणूक करताना खालील बाबी नक्की ध्यानात घ्या.

नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. नवी सुरुवात म्हटल की, अनेक जण संकल्प करतात आणि ते पूर्ण  करण्याचा प्रयत्न करतात. ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होवो किंवा न होवो. नियोजन आपण करायलाच हवे. येत्या वर्षात जर तुम्ही गुंतवणूकीचा संकल्प करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील. २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध, महागाई बाजारातील चढ उतार अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढील वर्षीही देश आणि जागतिक पातळीवर अनिश्चतता राहू शकते. अशा परिस्थितीत कोणत्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पुढील वर्षी गुंतवणूक (Investment In 2023) करताना खालील बाबी नक्की ध्यानात घ्या.

नव्या वर्षात बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता

नव्या वर्षात शेअर बाजारात चढउतार राहण्याची दाट शक्यता आहे. एप्रिल २०२० ते ऑक्टोबर २०२१ या काळात निफ्टी निर्देशांक ७,५११ अंकापर्यंत खाली आला होता. तर सर्वात जास्त १८ हजार,६०४ अंकांपर्यंत पोहचला होता. त्यामुळे येत्या वर्षातही बाजारात मोठी चढउतार होऊ शकते. कारण रशिया-युक्रेन युद्ध अद्याप संपलेले नाही. कच्चे तेल, अन्नधान्य आणि नैसर्गिक वायूच्या किंमतीत अचानक वाढही होऊ शकते. चीनसह काही देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झालेला असताना बाजारात अस्थिरता राहील, असे चिन्ह दिसत आहे.

जागतिक मंदीची शक्यता

२०२२ सालापेक्षा २०२३ मध्ये संपूर्ण जगाचा विकास दर कमी राहण्याची शक्यता आहे. जागितक अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे अमेरिका, युरोप खंड आणि चीन यांचा विकास दर खाली राहण्याची दाट शक्यता आहे. युरोपमध्ये तर मंदी येईल, असे अंदाज वर्तवले जात आहेत. तशी परिस्थिती सद्यस्थितीत निर्माण झाली आहे. चीनचा विकास दर ४ टक्क्यांपेक्षाही कमी राहण्याची शक्यता आहे. जागतिक मंदीचा परिणाम भारताच्या व्यापारावरही होईल. २०२३ मध्ये भारताचा विकास दर कमी राहण्याची शक्यता त्यामुळे निर्माण होऊ शकते.

अमेरिकेतील महागाई आणि व्याजदर

अमेरिकेतील महागाई आणि व्याजदराचा परिणाम संपूर्ण जगभर पडतो. अमेरिकेत मागील चाळीस वर्षात जास्त महागाई आहे. त्यामुळे फेडरल बँकेने व्याजदर वाढवले आहेत. मात्र, २०२३ मध्ये अमेरिकेतील महागाई नियंत्रणात आली तर वर्षाच्या शेवटपर्यंत बाजारात तेजी दिसू शकते. 

वैविध्यपूर्ण गुंतवणूक करण्यावर भर द्या

सध्या व्याजदर वाढत आहेत आणि बाँडमधून मिळणारा परतावाही चांगला आहे. त्यामुळे फिक्स इनकम पर्यायांमध्ये केलेली गुंतवणूक योग्य राहू शकते. डेब्ट फंडांमध्ये गुंतवणूक केली तर आकर्षक परतावा मिळू शकतो. सोन्यामधील गुंतवणूकीतुनही चांगला परतावा मिळू शकतो. सोन्याचे भाव हे डॉलरच्या किंमतीशी निगडीत असतात. अमेरिकेच्या सततच्या व्याजदर वाढीमुळे देशातील गुंतवणूक माघारी जात आहे. मात्र, आता डॉलर उच्च किमतीवर पोहचला आहे. येत्या वर्षात डॉलरचे मुल्य कमी झाल्यावर सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये इक्विटी बाजारात गुंतवणूक केली तर दीर्घकाळासाठी चांगला परतावा मिळू शकतो. बाजार पडलेला असताना इक्विटीमध्ये गुंतवणूक केली तर येत्या काळात पुन्हा बाजार वरती गेल्यावर गुंतवणूकदारांना नफा होईल. मात्र, संयम ठेवणे गरजेचे आहे.