Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gen Z Saving Tips: चोविस तास पार्टी मूडमध्ये असणाऱ्या Gen Z साठी बचतीच्या टीप्स

Gen Z Saving Tips

Gen Z भविष्याचा विचार न करता बिनधास्त आणि स्वत:च्या मनाप्रमाणे जीवन जगण्यावर भर देतात. स्वत:च्या मर्जीप्रमाणे जगताना बचत आणि गुंतवणुकीकडे मात्र, दुर्लक्ष होत आहे. या लेखात पाहूया यंग जनरेशनने गुंतवणूक आणि बचत करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

Gen Z Saving Tips: प्रत्येक जनरेशननुसार विचार करण्याची, राहण्याची आणि जीवनाकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी असते. मिलेनियल्स म्हणजे नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या मुला-मुलींना सरळधोपट मार्गानं जाण्याचा सल्ला दिला जायचा. तर दोन हजार सालाच्या दरम्यान जन्मलेली Gen Z भविष्याचा विचार न करता बिनधास्त आणि स्वत:च्या मनाप्रमाणे जीवन जगण्यावर भर देतात. स्वत:च्या मर्जीप्रमाणे जगताना बचत आणि गुंतवणुकीकडे मात्र, दुर्लक्ष होत आहे. 

कपडे, गॅझेट शापिंग, लाइफ स्टाइल मेंटेन करून भविष्यासाठी काही पैसे गुंतवणूक कशी करावी यासाठीच्या टिप्स या लेखात पाहूया. कारण, तरुण वयाच्या पुढे सरकल्यावर या जनरेशनलाही भविष्याची चिंता पडेलच.

ध्येय ठरवा आणि गुंतवणूक सुरू करा

Gen Z मुला-मुलींकडे वेळ हा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे. कमी वयात सुरू केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला परतावा मिळवून देईल. दीर्घकाळ, मध्यम किंवा अल्प कालावधी असे ध्येयाचे प्रकार ठरवू शकता. मग त्यात शिक्षण, एखादं स्कील अपडेट करण्यासाठीचा खर्च, भविष्यात स्वत:ची गाडी, घर, लग्न अशा गोष्टींसाठी लवकरच एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात मोठी राशी जमा होईल. 

गुंतवणुकीच्या ध्येयानुसार योग्य तो पर्याय निवडावा. शॉर्ट आणि मिडियम टर्म गुंतवणूक ध्येय गाठताना निश्चित परतावा देणाऱ्या योजना फायद्याच्या ठरू शकतात. तर दीर्घकाळाच्या गुंतवणूक ध्येयासाठी इक्विटीमधील इन्वेस्टमेंट फायद्याची ठरेल. 

एमर्जन्सी फंड उभा करा 

जर तुम्ही शिक्षण संपवून नोकरीला लागले असाल तर एमर्जन्सी फंडसाठी वेगळी गुंतवणूक सुरू करा. सहा महिन्यांपर्यंतचे खर्च भागतील एवढे पैसे एमर्जन्सी फंडात ठेवा. लिक्विड फंडसारखा गुंतवणुकीचा पर्याय त्यासाठी वापरू शकता. अचानक नोकरी गेल्यास, हेल्थ एमर्जन्सी किंवा कौटुंबिक एमर्जन्सीसाठी हे पैसे कामाला येतील. तसेच कोणाकडे पैसे मागण्याची वेळही येणार नाही. एमर्जन्सी सांगून येत नाही, त्यामुळे आतापासून तयारीला लागा. 

आर्थिक शिस्त आणण्यासाठी एसआयपी सुरू करा 

तुम्हाला जर जीवनात आर्थिक शिस्त आणायची असेल तर एकरकमी गुंतवणुकीपेक्षा एसआयपी सुरू करा. त्यामुळे महिन्यातील उत्पन्नाचा काही भाग आधी गुंतवला जाईल. उरलेल्या पैशांतून मासिक खर्च भागवता येतील. आधी बचत नंतर खर्च हे सूत्र एसआयपीमुळे शक्य होईल. मासिक उत्पन्नातील 10 टक्के हिस्सा एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकता. इंडेक्स, इक्विटी, डेट अशा विविध SIP सुरू केल्याने जोखीम कमी होऊन समतोल साधला जाईल.

आरोग्य आणि जीवन विमा 

कमी वयात टर्म इन्शुरन्स काढल्यास अगदी काही रुपयांत कोट्यवधींचे संरक्षण मिळेल. जसे वय वाढते तसे टर्म इन्शुरन्सचा हप्ता देखील वाढतो. जर तुम्ही 25 च्या आत टर्म इन्शुरन्स काढला तर अत्यंत कमी पैसे लागतील. तसेच आरोग्य विमा पॉलिसी सुद्धा घ्या. कंपनीच्या विम्यासोबतच स्वत:ची वेगळी पॉलिसी असेल तर जास्त सुरक्षा मिळते. बऱ्याच वेळा कंपनीचा विमा अपुरा पडू शकतो. 

इक्विटीची जोखीम घेताना फिक्स्ड इनकम पर्यायांना विसरू नका 

तरुण वयात इक्विटी म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे विविध पर्याय आहेत. मात्र, सगळी गुंतवणूक इक्विटीमध्ये न गुंतवता फिक्स्ड इनकम पर्यायांमध्येही काही गुंतवणूक करायला हवी. बाँड, रिअल इस्टेट, डेट फंड, हाय क्रेडिट कॉर्पोरेट एफडी, असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 

तुमच्या एकूण गुंतवणुकीपैकी 10 ते 15% गुंतवणूक निश्चित परतावा देणाऱ्या पर्यायांत असावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात. तसेच वेळोवेळी पोर्टफोलिओत मार्केटमधील परिस्थितीनुसार बदल करत राहा. जसे तुमचे ध्येय पूर्ण होतील, किंवा बदलतील त्यानुसार गुंतवणुकीची निती बदला.