Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Avoid Insurance Claim Rejection : इन्शुरन्स क्लेम रद्द होण्यामागील कारणे आणि उपाय जाणून घ्या

Avoid Insurance Claim Rejection

Reasons Of Insurance Claim Rejection : कुठलाही विमा खरेदी करणे हा व्यक्तिच्या वैयक्तिक वित्त धोरणाचा एक भाग आहे. आज प्रत्येक व्यक्तीकडे कोणत्या कोणत्या ना कोणत्या प्रकारचा विमा असतो. मात्र जेव्हा दावा (Claim) फेटाळल्या जातो, तेव्हा विमाधारकाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. विमा दावे (Insurance Claim) फेटाळण्याची कारणे काय आहेत आणि असे होवू नये म्हणून काय करता येईल, ते जाणून घेऊया.

How To Avoid Insurance Claim Rejection : आजच्या धावपळीच्या युगात आर्थिकदृष्ट्या सुरक्षित भविष्याची योजना आखणे फार गरजेचे झाले आहे. यासाठी प्रत्येकजण जीवन विमा पॉलिसी (Life Insurance) घेत असतो. परंतु, अत्यंत गरजेच्या आणि अडचणीच्यावेळी अनेकदा विमा पॉलिसीधारकाने किंवा त्याच्या नॉमिनीने केलेले दावे नाकारले जातात. दावे नाकारण्याची कारणे कोणती ती बघुया.

फसवणूक

काही प्रकरणांमध्ये असे होते की, एखादी व्यक्ती आजारी असल्यानंतर किंवा आता त्याचा मृ्त्यू नजीक आहे, हे जेव्हा कुटूंबियांना माहित होते. तेव्हा त्या व्यक्तीचा विमा काढल्या जातो. तर काही प्रकरणांमध्ये आधीच मृत व्यक्तींच्या नावावर पॉलिसी काढली जाते, ज्यामुळे त्याचे कुटूंबिय जीवन विमा लाभांचा दावा करु शकेल.

चुकीची माहिती पूरविणे

मुदत विमा योजना खरेदी करतांना, पॉलिसीधारकाचा उत्पन्न तपशील, आरोग्य स्थिती, वैद्यकीय इतिहास (Medical History), जीवनशैली याविषयीची सर्व माहिती अचूकपणे प्रदान करणे गरजेचे असते. जर पॉलिसीधारकाने यापैकी कुठलिही माहिती दिली नाही किंवा चुकीची माहिती दिली, तर ते दावा नाकारण्याचे वैध कारण (Valid Reason) बनू शकते.

प्रिमियम वेळेवर न भरणे

विमाकर्ते फक्त सक्रिय विमा पॉलिसींवर (Active Policy) दावे निकाली काढतात. प्रिमियम भरण्यास एका मर्यादेपेक्षा जास्त उशीर केल्यास पॉलिसी लॅप्स होते. एकदा पॉलिसी लॅप्स झाली की, तुमचे कुठलेही क्लेम यापुढे कव्हर केले जात नाही आणि आतापर्यंत भरलेले तुमचे सर्व प्रीमियम निरुपयोगी ठरत असते.

नॉमिनीची माहिती वेळेवर अपडेट करा

तसेच, नॉमिनीची माहिती वेळेवर अपडेट करा. तुम्ही ज्या व्यक्तिला नॉमिनी ठेवू इच्छीता त्या व्यक्तीची माहिती वेळेवर अपडेट करा. कारण वेळ पडल्यास, तुमच्यानंतर त्याच व्यक्तिला सर्व लाभ मिळत असते. असे न केल्यास, अनेक अडचणी निर्माण होतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विम्याचे दावे दाखल करण्यास उशीर करु नका.

विमा दावा नाकारण्यात आला, तर काय करावे?

तुम्ही सर्वप्रथम कंपनीच्या वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. त्यानंतर ग्राहक सेवा (Customer Care) किंवा दावे विभागात जावे. तेथे जाऊन सगळी माहिती घ्या आणि आवश्यक त्या गोष्टी पूर्ण करा. तुम्ही एजंटमार्फत पॉलिसी खरेदी केली तरीही या सेवा उपलब्ध होतील.

अगदीच गरज भासल्यास, तुम्ही तुमची तक्रार उच्च स्तरावर नोंदवण्यासाठी तक्रार निवारण अधिकारी (GRO) शी संपर्क साधू शकता. विमा नियामक IRDAI कडे तक्रार निवारण कक्ष देखील आहे. जेथे तुम्ही 'विमा भरोसा प्रणाली'(Insurance Trust System)अंतर्गत नियामकाकडे तुमच्या तक्रारी नोंदवू शकता. तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर, टोल-फ्री क्रमांकावर किंवा IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) पत्त्यावर प्रत्यक्ष स्वरूपात तक्रार नोंदवू शकता.