ट्विटरच्या धर्तीवर इन्स्टाग्राममध्येही थ्रेड ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. याबाबत अनेक जणांमध्ये संभ्रम आहे. ही सुविधा कशी वापरायची? यासाठी आणखी कोणते ॲप डाऊललोड करावे लागणार का? तर आज आम्ही तुम्हाला हे इन्स्टाग्राम थ्रेड कसे वापरायचे हे सांगणार आहोत.
Instagram Threads: फेसबुक, इन्स्टग्रामचा मालक मार्क झुकेरबर्ग याने नुकतीच इन्स्टामध्ये थ्रेड ही सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा तुमच्या इन्स्टाग्राममध्ये कशी सुरू करायची हे आपण समजून घेणार आहोत. यासाठी सर्वप्रथम Google Play Store मधून Threads, an Instagram app हे ॲप डाऊनलोड करा. ॲप डाऊनलोड केल्यानंतर ते ॲक्टिवेट करण्यासाठी इन्स्टाग्राम अकाउंटचे युझरनेम आणि पासवर्ड वापरून खाते सुरू करा. आता आपण यामध्ये थ्रेड कसे तयार करायचे हे समजून घेणार आहोत.
असे थ्रेड सुरू करा
- थ्रेड ॲप ओपन केल्यानंतर खालील बाजूस दिसणाऱ्या + या चिन्हावर क्लिक करा.
- आता इथे तुम्हाला जो मजकूर शेअर करायचा आहे तो इथे लिहा.
- थ्रेडमध्ये कमाल 10 थ्रेड जोडता येतात आणि प्रत्येक थ्रेडमध्ये 500 वर्णांची मर्यादा आहे.
- एका थ्रेडमध्ये 500 पेक्षा जास्त वर्ण झाल्यास ते आपोआप दुसऱ्या थ्रेडमध्ये जाणार.
- मॅसेजसोबत तुम्ही फोटो किंवा व्हिडिओसुद्धा जोडू शकता.
- Photo आणि Video जोडण्यासाठी attach या बटणावर क्लिक करा.
- अशाप्रकारे तुम्ही इन्स्टाग्रामसाठी थ्रेडचा वापर करू शकता.
Insta Thread साठी Instagram अकाउंटची गरज आहे का?
होय, Instagram Thread वापरण्यासाठी Instagram अकाउंटची गरज आहे. इन्स्टाग्राम ॲप वापरणे किंवा ते सुरू करणे हे आता खूपच सोपे झाले आहे. प्ले स्टोअरमधून ॲप डाऊनलोड करायचे. साईन अप करून अकाउंट सुरू करायचे. ज्यांचे फेसबुकवर अकाउंट आहे; ते त्या लॉगिनद्वारे इन्स्टाग्रामवर लॉगिन करू शकतात. एकदा इन्स्टाग्राम सुरू झाले की, त्याच पद्धतीने प्ले स्टोअरमधून इन्स्टाग्राम थ्रेड ॲप डाऊनलोड करा आणि थ्रेडचा आनंद लुटा.
डेस्कटॉपवर इन्स्टाग्राम थ्रेड वापरता येते का?
सध्या इन्स्टाग्राम थ्रेड ही सुविधा फक्त ॲण्ड्रॉईड आणि आयफोनसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ती सध्या डेस्कटॉपसह इतर ठिकाणी वापरता येत नाही. इन्स्टाने Threads Website सुरू केली आहे. पण सध्या त्यावरील ॲक्टीव्हिटी सुरू करण्यात आलेली नाही. त्यावर दिलेला QR Code स्कॅन केल्यावर तो तुम्हाला तुमच्या थ्रेड मोबाईल ॲपवर घेऊन जातो. याची डेस्कटॉप आवृत्ती लवकरच सुरू होईल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.