Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wedding Budget: लग्नसराईच्या काळात वाढली महागाई! केटरिंग, डेकोरेशन चे भाव वधारले!

Inflation increased during wedding season

Inflation increased during the wedding season: सध्या लग्नसराईच्या काळात महागाईने तोंड वर काढले आहे. लग्न इन्स्टाग्रामेबल होण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. डेकोरेशन, केटरींगचे दर कितीने महाग झाले आहेत आणि ते महागले आहेत याची कारणे या लेखातून समजून घ्या.

Inflation takes a toll on the wedding budget: सध्या अनेक घरांमध्ये लग्नसराईची लगबग सुरू असणार आहे. लग्नाची खरेदी, हॉलची नोंदणी, डेकोरेशन, मेहंदी, डिजे इत्यादी सर्वांचे व्यवस्थापन, बोलणी, वाटा-घाटी सुरू असणार आहेत. यादरम्यान, एक गोष्ट लक्षात आली असेल ती म्हणजे सध्या सर्वच गोष्टी दर वाढले आहेत. महागाई दिवसागणिक वाढत आहे, असे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, केटरींग आणि डेकोरेशनचे दर वाढले आहेत.

डेकोरेशन का महागले? (Why is the decoration expensive?)

मागील वर्षापासून डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड वाढत आहे आणि यंदाही हा ट्रेंड दिसून येत आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी लोणावळा, इगतपूरी, कोकण, गोवा, कोलाड, भंडारधरा आदी ठिकाणी प्रामुख्याने निवडली जातात. येथे डेकोरेशनचे सामान तुलनेने महाग मिळते. ताजी फुले, क्रिएटीव्ह डेकोरेशन करणाऱ्या स्किल्ड व्यक्तींची कमी असल्याने त्यांचे दर अधिक असतात. त्यामुळे पॅकेजमध्ये डेकोरेशन सामील असले तरी डेकोरेशनचे पैसे अधिक असतात. त्यात विशेष म्हणजे सध्या मट्रो शहर असो वा टियर 2 किंवा टियर 3 या शहरांमध्ये मागील तीन वर्षांच्या तुलनेत, मंडप घालवण्याचे, ते बांधण्याचे एकूण दर 55 टक्क्यांनी वाढला आहे. तर इतर प्लॅस्टीक आणि फायबरच्या डेकोरेशनचे सामान हे मुख्यत्त्वे चीनमधून येते. सध्या चीनमधून येणाऱ्या सामानाच्या किंमतीत 22 ते 26 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे, डेकोरेशनच्या किंमती वाढल्या आहेत, असे वेडिंग प्लॅनर अल्पेश तांबोळी यांनी सांगितले.

अलिकडे इन्स्टाग्रामेबल डेकोरेशन, बॅकग्राऊंड, प्रोप्स आदी वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून केली जाते. बँक्विट हॉल, लॉन, हॉटेल आदी कुठेही लग्न केले तरी फोटो परफेक्ट डेकोरेशनची डिमांड केली जाते. आजकाल, लग्नात नृत्याविष्कार होत असतात ज्यासाठी लाईटींगची वेगळी खास सोय करावी लागते. तसेच विशिष्ट वेगळ्या प्रकारची एंट्री घेण्यासाठी विविध प्रॉप्स लागतात या सगळ्यामुळे बजेट वाढते, असे डेकोरेटर कौस्तुभ कारेकर यांनी सांगितले.

लग्नातील जेवणाचे बजेट वाढण्यामागील कारण? (Why wedding food budget increases?)

लग्नात जेवण हा भाग अतिशय महत्त्वाचा असतो. लग्नासाठी येणाऱ्या व्यक्ती, लग्नानंतरही तेथील जेवणाबाबत बोलत असतात. जेवण हा प्रत्येक समारंभातील महत्त्वाचा प्लॅनिंगचा भाग असतो. यासाठी चांगला केटररही गरजेचा असतो. सध्या केटररने त्यांच्या दरात 2021 वर्षाच्या तुलनेत 32 ते 36 टक्क्यांची वाढ केली आहे. केटरींग व्यवसायाचे करोना काळात मोठे नुकसान झाले होते, तसेच सध्या घरगुती गॅस, भाज्या, धान्य आदींमध्ये वाढ झाल्यामुळे केटरींगमध्ये वाढ झाली आहे.

लग्नाच्या जेवणात भारतीय जेवण, गोड पदार्थ हे असतात, मात्र त्यासह आता इटालियन पास्ता, चायनीज-कोरियन नुडल्स, साऊथ इंडियन उत्तप्पा, चाट कॉर्नर, बिहारी लिट्टी चोखा आदी पदार्थ ठेवण्याकडे कल वाढला आहे. तसेच, कप केक, पेस्ट्रीज, डोनट्स, ताज्या फळांसह क्रिम आदी पदार्थही ठेवण्यात येतात. इंटरनॅशनल पदार्थ ठेवल्यामुळेही जेवणाचे बजेट वाढते, असे राज केटररचे राज पाटील यांनी सांगितले.