Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

भारतातील महागाई आणखी वाढणार; ‘रॉयटर्स’च्या सर्व्हेक्षणातील निष्कर्ष

inflation-in-india-will-rise-further-findings-from-reuters-survey

भारताच्या महागाई दरात 2022 च्या (Inflation in India 2022) अंतिम टप्प्यापर्यंत वाढ होणार. त्यामुळे येत्या काही महिन्यांत रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

जागतिक पातळीवर सुरू असलेल्या आर्थिक घडामोडींमुळे सर्वच देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयाचं मूल्य कमी होत चाललं आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या तंट्यामुळे या देशांमधील आयातीवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने महागाई आटोक्यात आणण्यासाठी (RBI) मे आणि जूनमध्ये आपल्या रेपो दरात (Repo Rate) एकूण 90 बेसिस पॉईंट्सची वाढ केली. तरीही सध्याचा महागाई दर (Indian Inflation Data) आरबीआयने मर्यादित करून दिलेल्या 6 टक्क्यांच्यावरच राहिला आहे.

रॉयटर्स या संस्थेने 4 ते 11 जुलै यादरम्यान केलेल्या सर्व्हेक्षणातील अंदाजानुसार, तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत चलनवाढीचा दर अनुक्रमे 7.3 आणि 6.4 टक्के राहण्याची शक्यता आहे. तर यापूर्वीच्या सर्वेक्षणात, चलनवाढीचा दर वर्षाच्या अखेरीस आरबीआयच्या मर्यादित दरापर्यंत येणार होता.

42 अर्थतज्ज्ञांच्या सर्वेक्षणानुसार या आर्थिक वर्षात सरासरी चलनवाढीचा दर 6.8 टक्के इतका राहिला. जो एप्रिलनंतर 5.5 नंतर इतका वाढला. जो गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे 5.2 टक्के आणि 4.7 टक्के इतका खाली आला होता. या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी आरबीआयने सध्याच्या 4.90 टक्के असलेल्या रेपो दरात आणखी तीन चतुर्थांश टक्क्यांनी वाढ करून वर्षाच्या अखेरीस हा रेपो दर 5.65 टक्क्यापर्यंत नेण्याची अपेक्षा ठेवली आहे. जूनमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणापेक्षा हे प्रमाण किंचित जास्त असल्याचे दिसून आले आहे; जे तत्पूर्वी 5.50 टक्के होते. (what will be the Inflation Rate for June 2022?)

रायटर्सने केलेल्या या ताज्या सर्वेक्षणात निम्म्याहून अधिक अर्थतज्ज्ञांनी, म्हणजेच 48 पैकी 25 अर्थतज्ज्ञांनी या तिमाहीच्या अखेरीस दर 5.50 टक्के किंवा त्याहून अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

आरबीआयच्या मॉनेटरी कमिटीची ऑगस्टमध्ये रेपो दराबाबत बैठक होणार आहे. या बैठकीत आरबीआय रेपो दरात 35 बेसिस पॉईंटने वाढ करेल असा अंदाज 35 पैकी 10 अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला. तर 14 तज्ज्ञांनी या तिमाहीच्या तुलनेत कमी दरवाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. 9 तज्ज्ञांनी आरबीआय 50 बेसिस पॉईंट्सने रेपो दरात वाढ करेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

भारत ही सर्वात वेगाने वाढणार् या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, परंतु या आर्थिक वर्षात विकासदर सरासरी 7.2% राहण्याचा अंदाज आहे, जो मागील रॉयटर्सच्या सर्वेक्षणात अंदाजित केलेल्या 7.5% वेगापेक्षा किंचित कमी आहे आणि आरबीआयच्या 7.2% अंदाजाच्या अनुषंगाने आहे.

भारत जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक राहील. पण भारताला ज्या गोष्टींची गरज आहे. त्या मानकांनुसार भारताची वाढ अजूनही खूपच कमकुवत असेल, असे सोसायटी जनरलचे अर्थतज्ज्ञ कुणाल कुंडू यांनी म्हटले आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, पुढच्या वर्षापर्यंत महागाई दर कमी होण्याची अपेक्षा नाही. यातून बाहेर निघण्यासाठी किमान सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लागू शकेल, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

डॉलरच्या कमकुवत होत चाललेल्या रुपयामुळे हा प्रश्न आणखी चिघळत चालला आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे अगोदरच 6 टक्क्यांपेक्षा खाली आलेला भारतीय रूपया सप्टेंबरपर्यंत डॉलरच्या तुलनेत 80 रूपयांच्या नवीन निचांकी पातळीवर जाण्याची अपेक्षा होती, असे रॉयटर्सच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.