Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rice Export Ban: भारताच्या निर्यात बंदीने जागतिक बाजारपेठेत तांदूळ महागला

Rice Export Ban

Image Source : www.economictimes.indiatimes.com

Rice Export Ban:भारताने तांदुळाची निर्यात बंद केल्याने अमेरिकेसह अनेक देशांमधील नागरिकांना फटका बसला आहे. अनेक छोट्या देशांची अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे.

केंद्र सरकारने तांदूळ निर्यातीवर बंदी घातल्याचे पडसाद जागतिक बाजारात उमटू लागले आहेत. जागतिक पातळीवर तांदुळाच्या किंमतीत 12% ने वाढ झाल्याची माहिती एफएओ ऑर्गनायझेशनने दिली.

दि फूड अ‍ॅंड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ दि युनायटेड नेशन्सच्या (The Food and Agriculture Organization of the United Nations-FAO)आकडेवारीनुसार जुलै महिन्यात राईस प्राईस इंडेक्स 2.8% ने वाढला आहे. 

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जुलैमधील राईस प्राईस इंडेक्स 129.7 अंक इतका आहे. मागील 12 वर्षांतील तांदुळाच्या महागाईचा हा उच्चांकी स्तर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तो 20% ने जास्त आहे.

भारताने तांदुळाची निर्यात बंद केल्याने अमेरिकेसह अनेक देशांमधील नागरिकांना फटका बसला आहे. अनेक छोट्या देशांची अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे.

भारताच्या तांदुळ निर्यात बंदीनंतर जगभरात तांदुळाची मागणी प्रचंड वाढली आहे. लहरी हवामानाने अनेक देशांतील भातशेतीला फटका बसला असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यातच भारताच्या निर्यात बंदीने जागतिक बाजारात तांदुळाचा पुरवठा झपाट्याने कमी झाला आहे.

भारतासह आशियातील प्रमुख देशांमध्ये भात मुख्य अन्न आहे. तांदुळाच्या एकूण निर्यातीत भारत सर्वात मोठा वाटा आहे. जागतिक बाजारातील तांदुळाच्या एकूण निर्यातीत भारताचा 40% वाटा आहे.

भारतातून अमेरिका, श्रीलंका, थायलंड, इटली, स्पेन या देशांमध्ये बिगर बासमती तांदुळाची निर्यात केली जाते. वर्ष 2022-23 मध्ये भारतातून 4.2 बिलियन डॉलर्सचे बिगर बासमती तांदुळ निर्यात करण्यात आला होता.

गेल्या वर्षभरात भारतीय बाजारपेठेत तांदुळाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात तांदुळाचा नियमित पुरवठा व्हावा आणि किंमती स्थिर राहण्यासाठी सरकारने  बासमती, मसुरी, तुकडा बासमती या प्रकारातील तांदुळाच्या निर्यातीवर सरसकट बंदी घातली आहे.