Senior Citizens Scheme : भारतीय रेल्वे प्रशासनाने कोरोना महामारीच्या काळात बिघडलेली आर्थिक परिस्थिती रुळावर आणण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या तिकिटावरील सवलत बंद केली होती. यामुळे आर्थिक वर्षे 2022-23 मध्ये रेल्वेला 2,242 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक नफा झाला आहे. 20 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 दरम्यान रेल्वेने 1500 कोटी रुपयांचा अतिरिक्त नफा मिळविला आहे.
50 टक्क्यांपर्यंत दिली जायची सूट
कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर वृध्द प्रवाशांना देण्यात येणारी सवलत बंद करण्यात आली. कोरोना पूर्वी 60 वर्ष वयाच्या लोकांना रेल्वे तिकिटांवर 50 टक्क्यांपर्यंत सूट दिली जायची. ही सवलत पूर्ववत सुरु करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र रेल्वेने आणि केंद्राने अद्याप यावर कुठलाही विचार केला नाही.
2,242 कोटी रुपयांचा अतिरिक्त नफा
प्राप्त माहितीनुसार, 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 दरम्यानच्या काळात सुमारे 8 कोटी ज्येष्ठ नागरीकांना या सवलतीचा लाभ मिळाला नाही. यामध्ये 4.6 कोटी पुरुष, 3.3 कोटी महिला आणि 18,000 ट्रान्सजेंडर लोकांचा समावेश होता. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांकडून मिळणारा महसूल 5,062 कोटी रुपये होता. ज्यामध्ये दिली जाणारी सवलत रद्द केल्याने 2,242 कोटी रुपयांचा अतिरिक्त नफा देण्यात आला. तर, 20 मार्च 2020 ते 31 मार्च 2022 दरम्यान रेल्वेने 7.31 कोटी ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिली नाही. या काळात 3,464 रुपयांचा नफा रेल्वेला झाला होता. 58 वर्ष वयाच्या महिलांना आणि 60 वर्ष वयाच्या पुरुषांना रेल्वे तिकिट प्रवासात सूट दिली जायची.