Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Coffee Day: भारत कॉफीचे उत्पादन दुप्पट घेणार; सरकारकडून रोडमॅप तयार, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार

World Coffee Day 2023

Coffee Farming: भारतातील कॉफी जगभरातील पहिल्या 10 देशांच्या कॉफीमध्ये गणली जाते. भारतीय कॉफीला आपल्या देशात जितकी मागणी आहे. तितकीच भारताच्या बाहेरदेखील आहे. ही मागणी आणखी वाढवण्यासाठी आणि त्यानुसार कॉफीचा पुरवठा करण्यासाठी केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या कॉफी बोर्डाने एक योजना प्रस्तावित केली आहे.

Coffee Farming: केंद्र सरकारच्या कॉफी बोर्ड ऑफ मंडळाने शेतकऱ्यांना कॉफीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी आर्थिक मदतीची योजना तयार करत आहे. या योजनेंतर्गत सरकारने 10 वर्षांचा रोडमॅप तयार केला असून, या कालावधीत कॉफीचे उत्पादन दुपटीने घेऊन जगातील भारताचे स्थान आणखी वर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

आजच्या जागतिक कॉफी दिनाच्या (World Coffee Day 2023) पार्श्वभूमीवर तुम्हाला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल की, भारतातील कॉफी जगभरातील पहिल्या 10 देशांच्या कॉफीमध्ये गणली जाते. भारतीय कॉफीला आपल्या देशात जितकी मागणी आहे. तितकीच भारताच्या बाहेरदेखील आहे. ही मागणी आणखी वाढवण्यासाठी आणि त्यानुसार कॉफीचा पुरवठा करण्यासाठी केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या कॉफी बोर्डाने एक योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेंतर्गत कॉफीचे उत्पादन घेणाऱ्या राज्यांमधील उत्पादन आणखी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी या मंडळाने काही भागांची पाहणी देखील केली आहे. त्यानुसार जवळपास 2 लाख हेक्टर नवीन जागेवर कॉफीचे उत्पादन घेतले जाणार आहे.

दक्षिणेतील या 3 राज्यांतून सर्वाधिक कॉफी उत्पादन

भारतातील कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या 3 राज्यांतून सर्वाधिक कॉफीचे उत्पादन घेतले जाते. याशिवाय ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये तसेच आंध्रप्रदेश, ओडिशा या राज्यांमध्येही कॉपीचे पीक घेतले जात आहे. शेतकऱ्यांनी अधिकाधिक कॉफीची शेती करावी यासाठी सरकारकडून प्रोत्साहन योजना राबवल्या जात आहेत. नवीन योजनेनुसार सरकार शेतकऱ्यांना कॉफीचे पीक घेण्यासाठी किमान व्याजदराने आर्थिक मदत करणार आहे. तसेच जे शेतकरी कॉफीची शेती करतील. त्यांच्या कर्जावरील पहिल्या 5 वर्षाचे व्याज सरकार भरणार असल्याचे समजते. या योजनेला सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. पण येणाऱ्या काही दिवसांत सरकार ही योजना राबवण्याची शक्यता आहे.

कॉफीची निर्यात करणारे टॉप 5 देश table

2033 पर्यंत कॉफीचे उत्पादन दुप्पट

जगभरातील कॉफीची वाढती मागणी लक्षात घेऊन कॉफी बोर्डाने पुढील 10 वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपनुसार सरकार आता जेवढी कॉफी निर्यात करत आहे. त्याच्या दुप्पट कॉफी 2033 पर्यंत निर्यात करण्याची सरकारची योजना आहे. भारताने 2022 मध्ये 1.11 बिलियन डॉलरची कमाई केली होती. हे लक्ष्य येणाऱ्या 10 वर्षात याच्या चौप्पट होऊ शकतं.

2022-23 मध्ये 3.60 लाख टन उत्पादन

कॉफी बोर्डाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात भारतात 3.60 लाख टन कॉफीचे उत्पादन झाले होते. हे उत्पादन 4.72 लाख हेक्टर कॉफीच्या शेतीतून घेण्यात आले आहे. मागील 2-3 दशकात कॉफीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने सरकारकडून शेतकऱ्यांना कॉफीची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देणारी योजना आणली जाणार आहे.