Indiabulls Foundation Education Support Programme: इंडियाबुल्स ग्रुप ही एक मोठी व्यावसायिक कंपनी आहे. इंडियाबुल्स ग्रुप ऑफ सीएसआर डिव्हिजन अंतर्गत शिष्यवृत्ती देण्यामागे भविष्यातील पिढी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम घडवी, हा उद्देश आहे. इंडियाबुल्स फाउंडेशन एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम 2023 या शिष्यवृत्ती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना वसतिगृह आणि मेस शुल्क वगळता शैक्षणिक खर्च दिल्या जातो. इयत्ता 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा, आयटी, आयटीआय, व्यवस्थापन किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात शाश्वत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. आतापर्यंत 3500 विद्यार्थ्यांना डियाबुल्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती दिल्या गेली आहे.
पात्रता काय आहे
- उमेदवार भारतीय नागरिक असावा.
- त्याचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- तो बारावी उत्तीर्ण असावा.
- तो चालू शैक्षणिक वर्षात पदवी अभ्यासक्रम किंवा उच्च शिक्षण घेण्यास पात्र असावा.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- शिधापत्रिका (रेशनकार्ड)
- मार्कशिट/ प्रमाणपत्र
- कॉलेजचे वार्षिक शुल्क असलेले प्रॉस्पेक्टस (त्यात विद्यार्थ्याचे नाव, अभ्यासक्रमाचे नाव, शैक्षणिक वर्ष आणि एकूण वार्षिक शुल्काची रक्कम PDF स्वरूपात असणे आवश्यक आहे)
अर्ज फॉर्म
इंडियाबुल्स फाउंडेशन एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम 2023 वर अर्ज करतांना, 'आता अर्ज करा' बटणावर क्लिक करा. त्यानंतर 'नोंदणी करा' बटणावर क्लिक करा आणि आवश्यक नोंदणी तपशील भरा. त्यानंतर तपशील काळजीपूर्वक वाचा, सर्व आवश्यक तपशील भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.