India will benefit from Apple: ऑगस्ट 2021 पासून लागू करण्यात आलेल्या स्मार्टफोन प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही योजना अॅपलचे (Apple) कंत्राटी उत्पादक (Contract Manufacturers) आणि घटक पुरवठादार (Component Suppliers) यांनी मिळून सुरू केली आहे. या योजनेविषयी जाणून घेऊयात थोडक्यात.
रोजगारविषयी माहिती
पीएलआय योजनेंतर्गत, प्रत्येक लाभार्थ्याला इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे तीन महिन्यांच्या आधारावर जॉब डेटा सबमिट करावा लागतो. यासाठी भारतात अॅपलच्या आयफोनसाठी Foxconn, Wistron व Pegatron हे कंत्राटी उत्पादक आहेत. तर सनवोडा, एवरी, फॉक्सलिंक और सालकॉम्प यांचा घटक पुरवठादारांमध्ये समावेश आहे. तर सॅमसंगव्दारे 11,500 पेक्षा ही जास्त लोकांना रोजगार देण्यात आला आहे. फॉक्सकॉनने 40 टक्क्यांपेक्षा ही जास्त नोकऱ्या दिल्या आहेत. तसेच इतर कंपनीदेखील मोठया प्रमाणावर कार्यरत आहे.
भारतातील अॅपलचा कार्यभार
आयफोनसह स्मार्टफोनसाठी होसूरमध्ये 500 एकरचा प्लांट उभारणाऱ्या, टाटा समूहाच्यावतीने आतापर्यंत सुमारे 10,000 लोकांना रोजगार देण्यात आला असल्याची माहिती आधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळाली आहे. तसेच टाटा पुढील काही काळात म्हणजेच 18 महिन्यांत आणखी 45,000 लोकांना रोजगार देणार आहे, अशी आशादेखील व्यक्त करण्यात आली आहे. Apple भारतात आयफोनचे संयुक्तपणे उत्पादन करण्यासाठी टाटा विस्ट्रॉन ग्रुपसोबत चर्चा करत आहे. सध्या भारतात अॅपलचे हे तीन पुरवठादार निर्यातीसाठी iPhones 11, 12, 13 व 14 तयार करित आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये, फोनच्या जागतिक लॉन्चच्या 10 दिवसांच्या आत अॅपलव्दारे देशात नवीन iPhone 14 चे उत्पादन सुरू करण्यात आले आहेत. भारतात अॅपल उत्पादन क्षमता वाढवत असल्याचे चित्र दिसत आहे. आता ते कायमस्वरूपी चीनवरील निर्भरता कमी करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.