Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Startup Festival : बंगळुरुमध्ये 'इंडिया स्टार्टअप फेस्टिव्हल 2023' चे आयोजन; 10,000 स्टार्टअप होणार सहभागी

India Startup Festival : बंगळुरुमध्ये 'इंडिया स्टार्टअप फेस्टिव्हल 2023' चे आयोजन; 10,000 स्टार्टअप होणार सहभागी

इंडिया स्टार्टअप फाउंडेशनच्या वतीने स्टार्टअप बंगळुरूमध्ये INDIA STARTUP FESTIVL-02 (ISF) चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील 10000 हून अधिक स्टार्टअप कंपन्या सहभागी होणार आहेत. तसेच 500 पेक्षा जास्त गुंतवणूकदार या फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावणार आहेत. त्यामुळे नव उद्योजकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे.

तुम्ही एखादी कंपनी सुरू केली असेल अथवा तुमची उद्योग क्षेत्रात उतरण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. कारण, बंगळुरूमध्ये इंडिया स्टार्टअप फाउंडेशनच्या माध्यमातून स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी, मार्गदर्शन मिळण्यासाठी इंडिया स्टार्टअप फेस्टिव्हलचे (India Startup Festival 2023- ISF) दुसऱ्या सत्राचे आयोजन करत आहे. 10 ते 12 ऑगस्ट या कालावधीत बंगळुरूमधील मुद्दनहळ्ळी या ठिकाणी हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. नव उद्योजकांसाठी ही एक परवनीच असणार आहे.

10000 स्टार्टअप, 500 गुंतवणूकदार

भारत सरकारने 2016 मध्ये स्टार्टअप इंडिया हा एक उपक्रम सुरू केला. याचा मुख्य उद्देश हा नवीन उद्योग आणि उद्योजकांना प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मिती आणि करणे हा आहे. यातूनच प्रेरणा घेऊन  इंडिया स्टार्टअप फाउंडेशनच्या वतीने स्टार्टअप बंगळुरूमध्ये INDIA STARTUP FESTIVL-02 (ISF) चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील 10000 हून अधिक स्टार्टअप कंपन्या सहभागी होणार आहेत. तसेच 500 पेक्षा जास्त गुंतवणूकदार या फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावणार आहेत. त्यामुळे नव उद्योजकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे.

ग्रामीण क्षेत्राशी निगडीत स्टार्टअप

यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये प्रामुख्याने ग्रामीण, आरोग्य, फायनान्स सुविधा, शिक्षण, शेतीतंत्रज्ञान, फूडटेक या सारख्या क्षेत्रामध्ये स्टार्टअपच्या संधी यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. यासाठी या क्षेत्रातील अनेक अनुभवी आणि जाणकार मार्गदर्शन करणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. जे तळागाळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रभावी उपाय सुचवण्यासाठी उपस्थित राहतील.

10 सर्वोत्कृष्ट स्टार्टअपला बक्षीस-

स्टार्टअप इंडिया फेस्टिव्हल मध्ये स्टार्टअप सुरू करण्याऱ्यांसाठी या क्षेत्रातील उद्योजक मार्गदर्शक आणि गुंतवणूकदार हे या एकाच प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध होणार आहेत. जिथे तुम्ही तुमच्या स्टार्टटप कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मिळवू शकणार आहात. तसेच  स्टार्टअपला बुस्ट करण्यासाठी मार्गदर्शनही घेता येणार आहे. तसेच या स्टार्टअप फेस्टिव्हलच्या दरम्यान 100 उत्कृष्ट स्टार्टअप्सची निवड केली जाईल. त्यांना या ठिकाणी त्यांच्या स्टार्टअप संबंधित परफॉर्म करण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच यातून टॉप 10 स्टार्टअप्सना बक्षीसदेखील दिले जाणार असून त्यांच्या प्रोजेक्टसाठी आवश्यकतेनुसार या क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शही उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

फेस्टिव्हलसाठी नोंदणी आवश्यक-

या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या ( https://isf2023.com/ ) वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. या दोन दिवसीय फेस्टिव्हल साठी आयोजकांकडून शुल्क आकारले जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना 50% सूट दिली जाणार आहे. तसेच कॉर्पोरेट बल्क पास (3+)खरेदीवर 25% सूट देण्यात येणार आहे. तसेच स्टार्टअप प्रतिनिधी 2 पाससाठी  20% सूट दिली जाणार आहे.