कपील सिबल (Kapil Sibal) हे काँग्रेसच्या सरकारमध्ये केंद्रात माजी मनुष्यबळ विकास मंत्री राहिलेले आहेत. तसंच ते ज्येष्ठ वकीलदेखील आहेत. संयुक्त राष्ट्रानं नुकतीच काही आकडेवारी जाहीर केलीय. यात जगात भारत सर्वात जास्त लोकसंख्येचा देश होईल, असं म्हटलंय. वास्तविक चीनलाही (China) भारतानं केव्हाच मागे टाकलंय. यावरून सिबल यांनी देशातले काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. चीन आणि भारताची तुलना करणारे हे आकडे आहेत. लोकसंख्येसोबतच जीडीपी (Gross domestic product), बेरोजगारी (Unemployment), महागाई (Inflation) अशा विविध पातळ्यांवरची तुलनात्मक आकडेवारी सिबल यांनी मांडली आहे. यानिमित्तानं दोन्ही देशांमधलं अंतर किती जास्त आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय.
चीन-भारत आणि तफावत
देशातल्या नागरिकांनी जीडीपी, बेरोजगारी आणि वार्षिक महागाई यासारख्या बाबींवर लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी यानिमित्तानं केलंय. कारण भारत शेजारी चीनच्या तुलनेत सर्वच बाबतीत म्हणजे विकासाच्या मुद्द्यांवर मागे असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलंय. चीनपेक्षा भारताची लोकसंख्या जवळपास 30 लाखांनी जास्त आहे. चीनची लोकसंख्या 142.57 कोटीतर भारताची लोकसंख्या 142.86 कोटी इतकी आहे. जागतिक लोकसंख्येचा विचार केल्यास ती एकूण 800 कोटींच्या आसपास आहे. म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या एक तृतियांश भाग चीन-भारत लोकसंख्येनं व्यापलाय.
India ahead of China
— Kapil Sibal (@KapilSibal) April 20, 2023
Population :
India 1428 mn
China 1425 mn
Other indicators(2021)
World Bank Data :
GDP
China : $17.73 trillion
India : 3.18 trillion
Unemployment:
China : 4.8%
India: 7.7%
Annual inflation
(consumer prices) :
China : 1%
India : 5.1%
Think about it !
चीनपेक्षा मागे
भारतात ज्याप्रमाणं लोकसंख्या वाढ होतेय, त्या तुलनेत विकास दर मात्र कमालीचा खाली आहे. तरुणांची संख्या प्रचंड आहे. मात्र त्यांच्या हाताला काम नाही. इतर क्षेत्रांमधली कामगिरीदेखील समाधानकारक नाही. त्यामुळे लोकसंख्येच्या बाबतीत आपण चीनशी तुलना करत असलो तरी चीनपेक्षा आपण खूपच मागे असल्याचं सिबल यांनी या आकडेवारीवरून दाखवून दिलंय.
डेमोग्राफिक डिझास्टर
युनोच्या या आकडेवारीवरून काँग्रेसनं भाजपा सरकारवर टीका केलीय. लोकसंख्या तर वाढतेय. भारत जगातला सर्वात तरूण देश बनत आहे. मात्र या तरूण देशातल्या युवकांना रोजगार कुठे आहे, असा सवाल काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाटे यांनी उपस्थित केलाय. डेमोग्राफिक डिव्हिडंड आता डेमोग्राफिक डिझास्टर होत आहे. कारण आपल्या युवकांकडे रोजगार नाही. त्यांच्या रोजगाराविषयी कोणती चर्चादेखील होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.