भारत आणि कॅनडा या दोन देशातले संबंध गेल्या काही दिवसांमध्ये कमालीचे ताणले गेले आहेत. अशातच आता भारताने कॅनडात जाताना लागणारे व्हिजाही बंद केलं आहेत. याचाच आणखी एक भाग म्हणून आता तुम्हाला कॅनडाला काही कामानिमित्त जायचं असेल तर त्यासाठी थोडेथोडके नाही तर २५ टक्के अतिरिक्त पैसे भरावे लागतील. भारत कॅनडा वादानं आता एअर फेयरलाही उकळी आल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
भारत कॅनडा वादानं सध्याचा विमानप्रवास किती झाला महाग?
तिकीटांच्या दरात २५ टक्के वाढ झाल्याचा परिणाम म्हणून आता तुम्हाला दिल्लीहून टोरॅन्टो इथं जायचं असेल तर तुम्हाला मोजावे लागतील १ लाख ४६ हजार रुपये.
नवी दिल्ली ते मॉन्ट्रियल विमान प्रवास करायचा असेल तर तुम्हाला १ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
नवी दिल्ली ते वॅकूवर असा विमान प्रवास करायचा असल्यास आणि तुमचं बुकींग आगाऊ नसल्यास त्याचे तुम्हाला १ लाख ३३ हजार रुपये भरावे लागतील. याच रुटवर तुम्हाला कॅनडाहून परत यायचं असल्यास १ लाख ०३ हजार रुपयेच भरावे लागणार आहेत.
एका आठवड्यात किती विमान प्रवास होतात?
भारत आणि कॅनडा यांच्या ४० ते ४८ विमानफेऱ्या आठवड्याला होतात. एअर इंडिया आणि एअर कॅनडा ही दोनच विमानं हा प्रवास करतात. एअर इंडिया रोज नवी दिल्ली ते टोरॅन्टो आणि नवी दिल्ली ते वॅकूवर दरम्यान ये जा करतात तर एअर कॅनडा नवी दिल्ली ते टॉरेन्टो असा विमान प्रवास रोज प्रवास करतं.नवी दिल्ली ते मॉन्ट्रियल असा विमानप्रवास एअर कॅनडा आठवड्यातनं तीन वेळा करतं. २०२३ साली आजपर्यंत या दरम्यान ६ लाख ७८ हजार ६१४ प्रवाशांनी प्रवास केला आहे.