यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाली. काही ठिकाणी अत्यंत कमी तर काही जिल्ह्यांत अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीमध्ये रोग पसरवणारे डास (Mosquito) आणि इतर कीटक सक्रिय होतात. याचा सार्वजनिक आरोग्याला (Health) मोठा धोका निर्माण होतो. जसजसं हवामान बदलतं तसतसे वेक्टर बोर्न रोगांशी संबंधित धोके वाढत जातात. या परिस्थितीत कुटुंबांच्या रक्षणासाठी आरोग्य विमा संरक्षण घेणं फायद्याचं ठरतं. एखाद्या व्यक्तीच्या जीवनातल्या कठीण काळात आरोग्य विमा कशी महत्त्वाची भूमिका बजावतं, त्याची माहिती घेऊ...
Table of contents [Show]
आर्थिक संरक्षण
डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुन्या यांसारख्या आजारांमध्ये आरोग्याची तीव्र समस्या निर्माण होते. तर काही उपचार दीर्घकाळ राहू शकतात. अशास्थितीत आरोग्य विमा हे आर्थिक सुरक्षा जाळं म्हणून काम करतं. यामुळे जो यासंबंधीत जास्त खर्च होणार असतो, तो कमी करता येवू शकतो. हॉस्पिटलायझेशन, डायग्नोस्टिक्स, औषधे आणि फॉलो-अप कन्सल्टेशन यामुळे विमा संरक्षण नसलेल्यांना आर्थिक ताण येवू शकतो. आरोग्य विमा काढल्यास यातल्या खर्चापासून बऱ्यापैकी दिलासा मिळतो.
चांगल्या वैद्यकीय सुविधा
आरोग्य विमा काढलेल्या व्यक्तींना वेक्टर बोर्न रोगांचं निदान, उपचार आणि व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय सेवांचे विविध पर्याय मिळतात. डॉक्टरांचा सल्ला, प्रयोगशाळेच्या चाचण्या, डायग्नोस्टिक इमेजिंग, प्रिस्क्रिप्शन औषधं आणि गरज असेल तर हॉस्पिटलायझेशन या सेवांचा समावेश आहे. याशिवाय आरोग्य विम्यामध्ये अनेकदा प्रतिबंधात्मक उपायांचा समावेश होतो, प्रामुख्यानं लसीकरण आणि तपासणी याचा यात समावेश आहे. ज्यांच्याकडे विमा नाही, ते अनेकवेळा आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करतात. शेवटी परिस्थिती गंभीर बनते आणि दुर्दैवानं अनपेक्षित गोष्टी घडतात. म्हणून अशा परिस्थितींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विमा संरक्षण निवडणं चांगलं आहे.
वेक्टर रोग प्रतिबंधक संरक्षण
आरोग्य विम्यामध्ये अनेकदा कीटकनाशक, मच्छरदाणी आणि लसीकरण यांसारख्या प्रतिबंधात्मक उपायांचा समावेश होतो. हे संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे असतात.
दीर्घकालीन उपचार आणि काळजी
काही वेक्टर-जनित रोगांचे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. यासाठी मेडिकल केअर आणि पुनर्वसन म्हणजेच रिहॅब आवश्यक आहे. हेल्थ इन्शूरन्स व्यक्तीला रिकव्हरीदरम्यान फॉलो अप कन्सल्टेशन, फिजिओथेरेपी आणि अन्य विशेष सेवा देते. या माध्यमातून व्यक्ती आर्थिक भार न उचलता शिवाय चांगली सेवा प्राप्त करू शकतो.