गुंतवणूकदार स्मॉल कॅप शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक (Investment) करत आहेत. मासिक आधारावर स्मॉल कॅप फंडातली गुंतवणूक 50 टक्क्यांनी वाढून 3282 कोटी रुपये झाली आहे. दुसरीकडे एएमएफआयच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात एकूण इक्विटी म्युच्युअल फंडातली (Equity mutual fund) गुंतवणूक निम्म्यानं कमी होऊन 3,240 कोटी रुपये झाली आहे. सध्या, स्मॉल कॅप्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली आहे. त्यामुळे या योजनांमधून मिळणारा अल्पकालीन तसंच दीर्घकालीन परतावादेखील सुधारला आहे. मागच्या 5 वर्षांत काही योजनांनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट किंवा त्याहूनही जास्त दिले आहेत. फायनान्शिअल एक्स्प्रेसनं हे वृत्त दिलंय.
Table of contents [Show]
उच्च परतावा मिळण्याची अपेक्षा
बाजाराचा दृष्टीकोन याबाबत सकारात्मक होत चालला आहे. मॅक्रो कंडिशन्स आणि ग्रोथ इंडिकेटर्समध्ये सातत्यानं सुधारणा होण्याचे संकेत आहेत. अशा स्थितीत गुंतवणूकदारांना मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये उच्च परतावा मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळेच गुंतवणूकदारांचा स्मॉल कॅप्सवर जास्तीत जास्त भर आहे.
स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये संधी
स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्येही मोठ्या संधी आहेत. या सेगमेंटमध्ये अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या त्यांच्या क्षमतेच्या दृष्टीनं कमी म्हणजेच अंडरव्हॅल्यूड आहेत. त्यांचे शेअर्स आकर्षक मूल्यांकनावर व्यवहार करत आहेत आणि त्यांच्यात वाढीचीदेखील मोठी क्षमता आहे. या कारणामुळे गुंतवणूकदार विशेषतः स्मॉल कॅप्सकडे वळले आहेत. यातली जोखीम निश्चितपणे लार्ज कॅप्सपेक्षा जास्त आहे, मात्र दीर्घकालीन या योजना उच्च परतावा देऊ शकतात.
5 वर्षांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या योजना
क्वांट स्मॉल कॅप (Quant small cap)
- 5 वर्षांमध्ये एसआयपी परतावा: 38.62 टक्के प्रतिवर्ष
- 5 वर्षात 5000 रुपये मासिक एसआयपीचं मूल्य: 7.60 लाख रुपये
- 5 वर्षांत एकूण गुंतवणूक: 3 लाख रुपये
- खर्चाचं प्रमाण: 0.62 टक्के
निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप (Nippon India small cap)
- 5 वर्षांमध्ये एसआयपी परतावा: 31.26 टक्के प्रतिवर्ष
- 5 वर्षात 5000 रुपये मासिक एसआयपीचं मूल्य: 6.41 लाख रुपये
- 5 वर्षांत एकूण गुंतवणूक: 3 लाख रुपये
- खर्चाचं प्रमाण: 0.80 टक्के
आयसीआयसीआय प्रू स्मॉल कॅप (ICICI Pru SmallCap)
- 5 वर्षांमध्ये एसआयपी परतावा: 28.41 टक्के प्रतिवर्ष
- 5 वर्षात 5000 रुपये मासिक एसआयपीचं मूल्य: 6 लाख रुपये
- 5 वर्षांत एकूण गुंतवणूक: 3 लाख रुपये
- खर्चाचं प्रमाण: 0.86 टक्के
कोटक स्मॉलकॅप (Kotak small cap)
- एसआयपी 5 वर्षांमध्ये परतावा: 28.25 टक्के प्रतिवर्ष
- 5 वर्षात 5000 रुपये मासिक एसआयपीचं मूल्य: 5.99 लाख रुपये
- 5 वर्षांत एकूण गुंतवणूक: 3 लाख रुपये
- खर्चाचं प्रमाण: 0.45 टक्के
अॅक्सिस स्मॉल कॅप (Axis Smallcap)
- एसआयपी 5 वर्षांमध्ये परतावा: वार्षिक 27.53 टक्के
- 5 वर्षात 5000 रुपये मासिक एसआयपीचं मूल्य: 5.89 लाख रुपये
- 5 वर्षांत एकूण गुंतवणूक: 3 लाख रुपये
- खर्चाचं प्रमाण: 0.55 टक्के
3 वर्षाची सर्वोत्तम कामगिरी करणारी योजना
- क्वांट स्मॉलकॅप: 36.34 टक्के
- निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप: 33.84 टक्के
- टाटा स्मॉलकॅप: 32.65 टक्के
- एचडीएफसी स्मॉलकॅप: 32.27 टक्के
- एचएसबीसी स्मॉलकॅप: 31.37 टक्के
1 वर्षाची सर्वोत्तम कामगिरी करणारी योजना
- एचडीएफसी स्मॉलकॅप: 44.68 टक्के
- फ्रँकलिन इंड स्मॉलर कंपन्या: 40.36 टक्के
- निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप: 39 टक्के
- टाटा स्मॉलकॅप: 38.90 टक्के
- क्वांट स्मॉलकॅप: 38.54 टक्के
(Source: Value Research)