• 24 Sep, 2023 02:01

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shiv Chhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराच्या रकमेत वाढ, आता मिळणार 5 लाख रुपये

Shiv Chhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराच्या रकमेत वाढ, आता मिळणार 5 लाख रुपये

Image Source : www.economictimes.indiatimes.com/www.hubert-herald.nl

महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा सरकारकडून आदरपूर्वक सन्मान केला जातो. अशा खेळाडू, मार्गदर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराची रक्कम 5 लाख रुपये करण्यात आली आहे. तर इतर पुरस्काराची रक्कम ही 3 लाख रुपये करण्यात आली आहे.

क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांचा दरवर्षी महाराष्ट्र शासनाकडून शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार (Shiv Chhatrapati Award) देऊन गौरव केला जातो. यामध्ये अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक आणि प्रशिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सोमवारी राज्य सरकारकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे स्वरुप

राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, मार्गदर्कसाठी जिजामाता पुरस्कार, खेळांडूसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा  पुरस्कार आणि दिव्यांग खेळांडूसाठी देखील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराने गौरवण्यात येणाऱ्या खेळाडूंना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र यासह भरीव रक्कमही देण्यात येते. सोमवारी राज्य शासनाकडून मागील तीन वर्षातील पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी राज्य सरकारकडून शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या रक्कमेत भरीव वाढ करण्यात आली.

जीवन गौरव पुरस्काराच्या रकमेत वाढ

महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा सरकारकडून आदरपूर्वक सन्मान केला जातो. अशा खेळाडू, मार्गदर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराची रक्कम 5 लाख रुपये करण्यात आली आहे. तर इतर पुरस्काराची रक्कम ही 3 लाख रुपये करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यापूर्वी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्या खेळाडूंना 3 लाख रुपये आणि अन्य पुरस्कार विजेत्यांना 1 लाख रुपये दिले जात होते.

2019-20,2020-21 आणि 2021-22 या 3 वर्षांचे एकूण 117 पुरस्कार

राज्य शासनाचा 'शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झालेल्यामध्ये श्रीकांत वाड,दिलीप वेंगसरकर आणि आदिल सुमारीवाला या मान्यवरांचा समावेश आहे. तर  इतर उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक जिजामाता पुरस्कार', 'शिवछत्रपती साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार'यामध्ये सर्व खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक असे एकूण 117 पुरस्कार विजेते आहेत.

जीवन गौरव पुरस्कारांच्या रकमेतही वाढ-

राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाकाडून विविध जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. यामध्ये अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव, लता मंगेशकर पुरस्कार जीनव गौरव, प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव,  भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव इत्यादी पुरस्कारांची रक्कम 5 लाखा ऐवजी 10 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.