Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax Return भरण्याची गरज कुणाला नसते, याविषयीचा नियम काय आहे?

Income Tax Return

नव्यानेच जॉबला लागला आहात आणि Income Tax Return फाइल करणे अस काही हल्लीच ऐकून, ही काय नवी डोकेदुखी, अशा चिंतेत आहात. पण त्याआधी जाणून तर घ्या की हे तुमच्यासाठी सक्तीचे आहे की नाही?

Income tax Return फाइल करणे ही एक दरवर्षीची महत्वाची प्रक्रिया आहे. पण नियमाप्रमाणे काही जणांना याची आवश्यकता नसते.  आयकर रिटर्न फाईल करण्यासाठी निश्चित कालावधी देण्यात आलेला असतो. आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीखही निश्चित करण्यात आलेली असते. Income Tax Return last date  नंतर करदात्यांना वाढीव मुदतही  देण्यात येते. मात्र इथे हे लक्षात घ्यायला हव की या वाढीव मुदतीसाठी पैसे मोजावे लागतात.  पण यानंतरही अनेक जण या पुढच्या कालावधीतही  कर भरत नाहीत आणि मग त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ला सामोरे जायची वेळ येते.  काही प्रकरणामध्ये  शिक्षेची पण तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे इथे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुमची कमाई करपात्र असेल तर तुम्हाला प्राप्तिकर रिटर्न भरणे आवश्यक असते.

ITR हा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जमा करण्यात येतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्यक्षस्वरुपात कर जमा करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येतो. आयटीआर रिटर्न हा एक अर्ज असतो, ज्याचा उपयोग  कर देण्यासाठी करण्यात येतो. Income Tax (भारतीय प्राप्तिकर खाते) कडून तुमची कमाई, संपत्तीवर काही ठराविक कर आकारण्यात येत असतो. केवळ एखादी व्यक्ती करपात्र असते अस नव्हे. त्याचबरोबर कृत्रिम न्यायिक व्यक्ती, एखादी फर्म, सार्वजनिक न्यास, ट्रस्ट, कंपनी असेही करदाते असतात. आयकर भरताना व्यक्तीला कोणतेही कागदपत्र (document )जोडायची गरज भासत नाही. केवळ एक फॉर्म जमा करावा लागतो.

करदाता ITR ला आधार कार्डच्या मोबाईल क्रमांक अथवा इंटरनेट बँकिंगचा वापर करुन जमा करण्याची प्रक्रिया पार पाडत असतो.  हे करताना  OTP द्वारे ई-सत्यापन करतो. त्यानंतर आयटीआर अर्ज जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते.  करदात्यांसाठी काही श्रेणी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व करदात्यांना निश्चित कालावधीत कर जमा करावा लागतो.

कुणाला नसते कर देण्याची गरज? 

काही जणांना कर देण्याची बिलकूल आवश्यकता नसते. ज्या व्यक्तींचे वय 60 वर्षांहून कमी आहे आणि  त्यांची वार्षिक कमाई 2.5 लाख रुपयापर्यंत आहे. त्यांना कर देण्याची गरज नसते.  मात्र, या दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिकचे उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला आयटीआर अर्ज जमा करावा लागतो.समजा , एखाद्या व्यक्तीचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि 80 वर्षांपेक्षा कमी आहे. अशा स्थितीत त्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपायपर्यंत आहे. तरीही त्या व्यक्तीला कराच्या परीघाबाहेर  ठेवण्यात येते. त्यांना कर भरावा लागत नाही.एखाद्या व्यक्तीचे वय 80 वर्षांपेक्षा अधिक असेल  आणि त्याची वार्षिक कमाई 5 लाख रुपयेपर्यंत  असेल त्या व्यक्तीला कर भरण्याची गरज नाही. ही उत्पन्न मर्यादा वेळोवेळी निश्चित होत असते. यासाठी आता येणाऱ्या Budget 2023 वर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. यासाठीचे अपडेट्स मिळवण्यासाठी  mahamoney शी जोडले   राहा .