आयकर विभागाने करदात्यांसाठी नवीन मोबाइल अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे करदात्यांना मोबाइलवर टीडीएससह वार्षिक माहिती विवरणपत्र ( Annual Information Statement - AIS) पाहता येणार आहे. आयटी विभागाने बुधवारी सांगितले की, यासह, करदात्यांना देय किमतीवर होणारी कर कपात / उत्पन्नावरील कर संकलन (टीडीएस / टीसीएस), व्याज, लाभांश आणि शेअर डील याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. यासोबतच त्यांना त्यावर मत मांडण्याचा पर्यायही अॅपमध्ये मिळणार आहे.
करदात्यांना या मोबाइल अॅपद्वारे वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) / करदाता माहिती विवरण पत्र (TIS) मध्ये बघता येईल. 'एआयएस फॉर टॅक्सपेयर्स' हे मोबाईल अॅप्लिकेशन नुकतेच लाँच झाले आहे. आयकर विभागाकडून ही सेवा करदात्यांसाठी विनामूल्य दिली जाणार आहे. हे अॅप Google Playstore आणि App Store वर उपलब्ध आहे.
AIS अॅप कसे डाउनलोड करावे? (How to Download AIS App?)
- Google Play Store वर जा
- सर्च ऑप्शनमध्ये AIS for Taxpayers टाइप करा
- आता Download करा
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने निवेदनात म्हटले आहे, "अॅपचा उद्देश करदात्याला AIS/TIS बद्दल माहिती प्रदान करणे आहे. ते करदात्यांच्या संबंधित विविध स्त्रोतांकडून गोळा केलेली माहिती एका क्लिक वर झटपट देणार आहे." AIS/TIS मध्ये उपलब्ध TDS/TCS, व्याज, लाभांश, शेअर व्यवहार, कर देयके, आयकर परतावा, इतर (GST डेटा, परदेशी रेमिटन्स इ.) यांच्याशी संबंधित माहिती बघण्यासाठी करदाते हे मोबाइल अॅप वापरू शकतात. अॅपमध्ये दाखवलेल्या माहितीवर फीडबॅक देण्याचा पर्याय आणि सुविधा देखील करदात्यांना उपलब्ध आहे. आयकर विभागाने सांगितले की, सुलभ वापर आणि करदात्याला चांगली सेवा प्रदान करण्याच्या क्षेत्रात विभागाचा हा एक उपक्रम आहे
नवीन AIS मोबाईल अॅप कसे वापरावे? (How to use the new AIS mobile app?)
नवीन ITR मोबाइल अॅप वापरण्यासाठी करदात्यांनी त्यांचा पॅन क्रमांक टाकून अॅपवर नोंदणी करणे आवश्यक आहे आणि मोबाईल नंबरवर जारी केलेला OTP आणि ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत ईमेल वापरून साईन इन करा. मोबाइल अॅपमध्ये प्रवेश करण्यासाठी करदात्याला साईन इन 4-अंकी पिन सेट करणे आवश्यक आहे.
Source: www.zeebiz.com