Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Moonlighting income: मूनलायटिंगमधून अतिरिक्त कमाई करत असाल तर सावधान..! आयकर विभागाची आहे विशेष नजर

Moonlighting income: मूनलायटिंगमधून अतिरिक्त कमाई करत असाल तर सावधान..! आयकर विभागाची आहे विशेष नजर

Image Source : www.ndtv.com

Moonlighting income: मूनलायटिंगच्या माध्यमातून अतिरिक्त कमाई करणाऱ्या व्यावसायिकांवर आता आयकर विभाग अधिक लक्ष ठेवून आहे. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरताना खरं उत्पन्न लपवणं तुम्हाला महागात पडू शकतं. याचविषयी सविस्तर माहिती घेऊ...

कायमस्वरूपी पूर्णवेळ नोकरीशिवाय कंपनीच्या धोरणाविरुद्ध दुसऱ्या ठिकाणी काम करून अतिरिक्त कमाई करणं यालाच मूनलायटिंग म्हटलं जातं. अशाप्रकारे काम करणं कंपनीच्या नियमांविरुद्ध असल्यानं आयटी विभाग विशेष लक्ष ठेवून असतं. सूत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या विशेष वृत्तानुसार, परदेशातून येणारं पेमेंट आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये फी घेणार्‍या कर्मचार्‍यांवर आयटी विभागामार्फत विशेष नजर ठेवली जात आहे.

येवू शकते नोटीस 

या संदर्भात आयकर विभागानं बड्या आयटी कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडूनही माहिती मागवली होती. जर टॅक्स डिडक्टेड अ‍ॅट सोर्स (Tax Deducted at Source - TDS) कपात आणि इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये काही जुळत नसेल तर विभागाकडून नक्कीच नोटीस पाठवण्यात येईल.

संपूर्ण माहिती आवश्यक

आयकर रिटर्न भरताना तुम्हाला उत्पन्नाचा खरा स्रोत दाखवावा लागणार आहे. तुम्हाला पगार किंवा व्यावसायिक फी किंवा व्यवसायाच्या मार्फत उत्पन्न मिळालं आहे का किंवा इतर काय स्त्रोत आहेत, याची माहिती द्यावी लागणार आहे.

मूनलाइटचा आयकरावर परिणाम 

इन्कम टॅक्समध्ये मूनलाइटचा वेगळा उल्लेख नाही. दुसऱ्या नियोक्त्याकडून मिळणारं उत्पन्न पगार किंवा व्यावसायिक फी म्हणून मिळू शकते. मूनलाइटचा आयकरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याबाबत सावध केलं आहे.

पीजीबीपी कर

व्यवसाय किंवा व्यावसायिक स्वरूपाच्या उत्पन्नावर पीजीबीपी (Profit and Gains of Business or Profession) या शीर्षकाखाली कर आकारला जाऊ शकतो. दुसऱ्या नोकरीदरम्यान झालेला खर्च, जसं की प्रवास खर्च, लॅपटॉपवरचा घसारा आदी व्यवसाय खर्च मानले जाऊ शकतात आणि त्यांच्या उत्पन्नातून कमी केले जाऊ शकतात. उर्वरित रक्कम लागू स्लॅब दरांवर करासाठी ऑफर केली जाणार आहे.

कोविडदरम्यान वाढला ट्रेंड

याशिवाय प्रिझम्प्टिव्ह टॅक्स सिस्टिमचा (Presumptive Tax System) गैरवापर करणाऱ्यांवरदेखील आयकर विभाग करडी नजर ठेवून आहे. कोविड-19 कालावधीत घरातून काम करताना मूनलायटिंगचा ट्रेंड झपाट्यानं वाढल्याचं दिसून आलं आहे. हे अतिरिक्त उत्पन्न लपवण्याचे प्रकारही दिसून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं लक्ष ठेवत सावधानतेचा इशाराच दिला आहे. करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी विभाग अधिक कठोर पावलं उचलणार आहे.