Maruti Suzuki Models In Top 10 List: एप्रिल 2023 मध्ये पॅसेंजर वाहनांच्या विक्रीत मारुती सुझुकी वॅगनार पहिल्या स्थानावर आहे. मारुती सुझुकीचे स्विफ्ट मॉडेल विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. मारुती सुझुकीची बॅलेनो तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर ब्रीझाला सहावे स्थान मिळाले आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर टाटाची नेक्सॉन आणि पाचव्या क्रमांकावर ह्युंदाईची क्रेटा आहे.
Table of contents [Show]
मारुतीची वॅगनार पहिल्या स्थानावर
एप्रिल 2023 मध्ये पॅसेंजर वाहनांच्या विक्रीच्या बाबतीत, मारुती सुझुकी कंपनीची वॅगनार पहिल्या स्थानावर आहे. एप्रिल 2023 मध्ये या मॉडेलच्या सुमारे 20,879 कार विकल्या गेल्या आहेत. एप्रिल 2023 च्या विक्रीची 2022 च्या एप्रिल महिन्याशी तुलना केली असता, त्यावेळी मारुती सुझुकी वॅगनारच्या एकूण फक्त 17,766 गाड्या विकल्या गेल्या होत्या.
मारुतीचे स्विफ्ट मॉडेल दुसऱ्या स्थानावर
मारुती सुझुकीचे स्विफ्ट मॉडेल विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. स्विफ्टची एप्रिल 2023 मध्ये 18,753 गाड्यांची विक्री झाली आहे. विशेष बाब म्हणजे एप्रिल 2022 मध्ये मारुती सुझुकी स्विफ्टच्या केवळ 8,392 गाड्यांची विक्री झाली होती. मार्च 2023 मध्ये, विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी स्विफ्ट पहिल्या स्थानावर होती. तर एप्रिल महिन्यात मारुती सुझुकी वॅगनारने पहिले स्थान मिळविले आहे.
बॅलेनो तिसऱ्या क्रमांकावर
मारुती सुझुकीची बॅलेनो तिसऱ्या क्रमांकावर आहे. एप्रिल महिन्यात या मॉडेलच्या एकूण 16,180 गाड्यांची विक्री झाली आहे. एप्रिल 2022 च्या महिन्याशी तुलना केल्यास, त्यावेळी या मॉडेलच्या केवळ 11,764 गाड्यांची विक्री झाली होती. गेल्या वर्षभरात यात मोठी वाढ झाली आहे.
ब्रीझा सहाव्या स्थानावर
मारुती सुझुकी कंपनीच्या इतर मॉडेल्सबद्दल बोलयचे झाल्यास, एप्रिल 2023 च्या सर्वाधिक पीव्ही विक्रीच्या (पॅसेंजर व्हेईकल सेल्स) यादीत ब्रीझाला सहावे स्थान मिळाले आहे. एप्रिल 2023 मध्ये, Brezza चे एकूण 11,836 मॉडेल विकल्या गेले आहेत. तर ऑल्टोला सातवे स्थान मिळाले आहे. ऑल्टोच्या एकूण 11,548 गाड्या एप्रिल 2023 मध्ये विकल्या गेल्या आहेत. मारुतीच्या इको मॉडेलला नववे स्थान मिळाले आहे. एप्रिल 2023 मध्ये या मॉडेलच्या एकूण 10,504 युनिट्सची विक्री झाली आहे.
टाटा कंपनी सुद्धा आघाडीवर
टाटाची नेक्सॉन आणि ह्युंदाईच्या क्रेटाला अनुक्रमे चौथे आणि पाचवे स्थान मिळाले आहेत. जर आपण एप्रिल 2023 च्या विक्रीवर नजर टाकली तर Tata Nexon च्या एकूण 15,002 युनिट्स आणि Hyundai Creta च्या 14,186 युनिट्सची विक्री झाली आहे. Hyundai Creta ची एप्रिल 2022 च्या तुलनेत या एप्रिलमध्ये अधिक विक्री झाली आहे.
व्हेन्यू मॉडेलला दहावे स्थान
एप्रिल 2023 मध्ये टाटा कंपनीच्या पंच मॉडेलला आठवे स्थान मिळाले आहे. पंच मॉडेलची विक्री 10,934 युनिट्स होती, ज्यामुळे तिला आठवे स्थान मिळाले आहे. दुसरीकडे ह्युंदाईच्या व्हेन्यू मॉडेलला दहावे स्थान मिळाले आहे. एप्रिल 2023 मध्ये या मॉडेलची एकूण विक्री 10,342 युनिट्स होती.